*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*
*☄विषय : कैफियत☄*
*🍂शनिवार : ०१/ मार्च/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*”कैफियत”*
*”कैफियत”* मांडू सांगा कुणाची,
येथे सारेच………… आपलेच आहे…
अन्याय झाले……….असह्य तरीही,
हृदयी त्यांना………. जपलेच आहे…१
स्वार्थ साधण्यात व्यस्त जरी ते,
आपले निस्वार्थ…. जगणे आहे…
त्यांचे त्यांना व्हावेत लखलाभ,
आम्हां तैसे नाही वागणे आहे…२
पाप पुण्य काय कळले नाही,
संकटी कुणाच्या धावणे आहे…
साऱ्या विश्वाचे…..दुःख उदरी,
आपुल्या उदरी लावणे आहे…३
नाही कुणाची तक्रार व्हावी,
नाही कुणी दुःखी असावेत…
*”सुधाकरा”* मानवी जन्मात,
सारे सारे………सुखी असावेत …४
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत मांडतो आम्हा पक्षांची
धडपड आमची रोजच्या जगण्याची
जंगलेच्या जंगले केलीस नष्ट
मानवा का इतका झालास दुष्ट
वृक्षवल्ली हेच आमचे घर
जगत होतो त्या फळांवर
बनवू शकत नाही कुठेच निवारा
सैरभैर होऊन शोधतो आसरा
कधी तारेला आम्ही लटकतो
तर कधी मांज्यात अडकतो
जखमी होऊन कुठेही पडतो
हकनाक आमचा जीव जातो
दाना ना पाणी आम्हाला मिळत
नष्ट होईल अशाने ही पक्षी जात
मुक्या जीवाची साद ऐक मानवा
भूतदया दाखवून पक्षांना जगवा
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
मन पाखरू पाखरू उडते
वेलीवरून झाडावर बसते
मध्येच हसते मध्येच रूसते
मना कैफियत कुणा सांगु ते||
एकटीच पक्षीणी भिरभिरते
घार येऊनी घाव घालते
गिधाडे बघून डगमगते
मना कैफियत कुणा सांगु ते||
मुसमुसते रडते पुन्हा उठते
पंख गोंजारते उडण्यास ते
सख्याच्या आठवणीत हिरमुसते
मना कैफियत कुणा सांगु ते||
चोच पोटात घालून विचार ते
कशी जगू तुझ्या वाचुन मी रे
सांग दैवा कसा केलास दूर रे
रंजना राहूलची अतूट जोडी रे||
आले तुझ्या दारात विठ्ठला
साभांळ तु माझ्या संसारा
उडते तुझ्या निळ्या आभाळा
कैफियत मांडते तुझ्या मंदीरा||
*कवी:रंजना राहुल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मो.जि.गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
कैफियत होती तिची
माझा दोष काय
जन्मा आधिची
गेली सोडून माय ॥१॥
ज्याने जन्म दिला
तोच जीवावर उठला
गळा माझा घोटला
पान्हा नाही फुटला ॥२॥
मुलगा व मुलगी
आपल्याच पोटचे गोळे
जीव घेताना मग
भरले नाही डोळे ॥३॥
प्रेमाचा तोडला धागा
करू कुणा कैफियत
किती केला तू त्रागा
घेशी जवळ वाटत होत ॥४॥
असा कुठला पिता
इतका होतो निष्ठुर
जन्मास मी येता
फेकतो उकीरड्यावर ॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर.शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
काय सांगू कैफियत
जीवनाची माझ्या खरी
गुंतले सर्व मोह पाशात
मी एकटा खाटल्यावरी
नाही कुणाचे प्रेम जरा
वार्धक्याने झालो जर्जर
आपुलकी ना दया मिळे
झालो जड मी सर्वांवर
भावना मनीच्या मनी
थिजतात जणू बर्फगोळा
झाले जीवन यंत्रवत
स्वप्न झाली चोळामोळा
सून,मूलं, नात, नातू
सर्व असे सुखाचे सोबती
नात्याच्या गुंफणीची खरी
वृद्धापकाळी येते प्रचिती
लोपली कशी मानवता
रक्ताचे नातेही लाजते
आधुनिकतेच्या संभ्रमात
वृद्धांची घरात लाज वाटते
परमात्मा आहे कर्ताधर्ता
द्यावं लागते त्याला उत्तर
जप अंतरात माणुसकी
न्याय करेल ईश्वर बरोबर
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कैफियत*
नव्या युगाची नव्या दमाची
आज मी आत्मनिर्भर नारी
दिली झुगारून पराधिनता
मी पिढ्यान् पिढ्यांची सारी.. //
आज जरी स्वावलंबी तरीही
प्रश्न सलतोय कायमचा उरी
पंच्याहत्तरीच्या स्वातंत्र्यात
मी स्वतंत्र आहे का हो खरी?.. //
दिवसभर मी रहावे बाहेर
आणि यंत्रवत राबावे जरी
अलिखित नियमात अजूनी
सातच्या आत यावेच घरी.. //
काय वर्णावी पुरूषी वृत्ती
स्पर्श बोचरे नजर विखारी
व्यक्ती नव्हे मी बाईच जणू
ही विकृती लागे जिव्हारी.. //
कधी द्रौपदी भरसभेतली
आज चौकात अत्याचारी
भोगवस्तूच का युगे युगे?
भोगा,जाळा,फेका गटारी.. //
कायदा मागे मला पुरावा
उदंड जाहले बलात्कारी
अन्यायी फिरतो राजरोस
न्याय मागते मी भिकारी.. //
सांगा मांडू कुठे कैफियत
शिवासारखा कोण कैवारी
इथे हजारो अनुयायी पर
एक भेटेना आचार विचारी.. //
धिक्कारते त्या बाहूबलाला
स्री शील भ्रष्टन्या जे उगारी
बलक्षीण तो व्हावा हर नर
जो मातेसम माने ना परनारी..//
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कैफियत*
कधी ओठांवर न आलेले,
कायम ह्रदयीच ते राहिले
शब्दही कातर हळवे झाले,
जेव्हा अश्रूंच्या गावी गेले…
रोज स्वतःला समजावते
पण मन ऐकत नाही
हसऱ्या मुखवट्या आड लपून,
वेदनाही झाकत नाही…
तुला सांगावं असं वाटलं,
पण स्वरच फुटले नाही
हात पुढे केला होता,
पण तूच बघितलं नाही…
रात्रभर चांदण्यात जपत होते,
तुझं सावलीसारखं अस्तित्व
पण पहाट झाली आणि वाटलं,
हरवलं ते स्वप्नगत सत्य…
आज ही कैफियत सांगतेय
तरीही कुणी ऐकेल का?
शब्दात अडकलेली वेदना,
कधी तुलाही समजेल का….
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰〽️🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



