Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

‘संस्कृती २०२६’ उपक्रम उत्साहात साजरा

0 4 8 2 8 4

दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

‘संस्कृती २०२६’ उपक्रम उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: ( दि ४) बेसा, नागपूर येथील दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘संस्कृती २०२६’ दिनांक २८ व २९ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सम्यक बन्सोड, संचालक -मानस अ‍ॅग्रो व व्यवस्थापन परिषद सदस्य- रा.तु.म.नागपूर विद्यापीठ हे उपस्थित होते. मान्यवर अतिथी म्हणून अनीश तनेजा, संचालक, केमफिल्ड सेल्युलोज, नागपूर व डॉ. ताकाशी सासे, सहाय्यक संचालक, केमफिल्ड सेल्युलोज, नागपूर उपस्थित होते.

व्यासपीठावर मनोज बालपांडे, अध्यक्ष -अंबे दुर्गा एज्युकेशन सोसायटी नागपुर सौ.वैशाली एम. बालपांडे, अध्यक्षा बालपांडे पब्लिक स्कुल, डॉ.उज्वला एन.महाजन, प्राचार्य, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ.सचिन एम. मोरे, विभागप्रमुख (डिप्लोमा) व डॉ. मोनाली डुमोरे, संस्कृती २०२६ चे सांस्कृतिक समन्वयक, हे उपस्थित होते. यावेळी डॉ. उज्वला महाजन यांनी पदवी अभ्यासक्रमाचा वार्षिक अहवाल सादर केला तर डॉ. सचिन मोरे यांनी डिप्लोमा विभागाचा वार्षिक अहवाल मांडला.

सदर कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन, फॅशन शो, मिस्टर अँड मिस फार्मा अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले पुनीत कुशवाहा रॉक बँड यांचा दमदार सादरीकरण कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने करण्यात आली. ‘संस्कृती २०२६’ च्या यशस्वी आयोजनासाठी दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी प्रतिनिधी परिषद (SRC), डॉ. निलेश महाजन, कु. मानसी बराई, डॉ. रोहिणी खरवडे, कु. वैष्णवी खडसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे