Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

माणूस बांधूया

स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 9 3

माणूस बांधूया

उन्हाच्या तीव्र झळेत
थोडं चांदणं शिंपूया..
संकटात मदतीचा
हात हातात गुंफूया..||१||
जळमटे मत्सराची
झाडून काढूया
मायेच्या स्पर्शाने
माणूस बांधूया..||२||
अहंकाराची पालवी
छाटून काढूया ..
आपलेपणाने नात्यांना
बहर आणूया..||३||
संशयाची ठिणगी
मनातून काढूया
विश्वासाने फुलवून नातं
माणूस बांधूया..||४||
दुरावल्या मनाचे
किनारे जोडूया..
विखुरल्या नात्यांचा
सांकव सांधूया..||५||
धागा धागा गुंफूनी
एक घरटं विणूया
प्रेमाच्या घट्ट नात्यांनी
माणूस बांधूया..!||६||

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे