चेहऱ्यावरील ईश्वरी तेजाचे रहस्य
तृप्ती पाटील मुलुंड (इस्ट),मुंबई

चेहऱ्यावरील ईश्वरी तेजाचे रहस्य
मनुष्य जेव्हा साधना, ध्यानधारणा करू लागतो. त्यावेळेला ध्यानातून त्या साधकाचे प्रत्येक चक्र जागृत होत असतात. जेव्हा सहस्त्रकर चक्र जागृत होतो, त्यावेळेला त्या साधकाच्या चेहऱ्यावरती तेज यायला सुरुवात होते. तेज म्हणजे काय? तर आपली जी आवरा असते म्हणजे आपली आत्मा असते, ती आत्मा स्पटिका सारखी पूर्णपणे शुद्ध होते आणि तेजस्वी होते. त्या आत्म्याचा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावरती पडलेला असतो आणि एक लखलखीत तेज आपल्या चेहऱ्यावरती येतं. जेव्हा सातही चक्र जागृत होतात, तेव्हा सहस्राकर चक्र त्यावेळेला त्या साधकाला वेगवेगळ्या देवतांचे दर्शन घडतं. वेगवेगळे देवता ऋषीमुनी त्या साधकाला मार्गदर्शन करीत असतात. जेव्हा ते मंत्र त्या साधकाला दिले जातात, म्हणजे वातावरणातील देव देवता त्या साधकाला वेगवेगळी मंत्र द्यायला जेव्हा सुरुवात करतात. तेव्हा त्या साधकाला एक दैवी तेज चेहऱ्यावर यायला सुरुवात होते.
त्वचा चेहऱ्याची तुकतुकीत दिसायला लागते. चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स कमी व्हायला सुरुवात होते. चेहऱ्यावरचे जे open पोर्स आहेत, ते पूर्णपणे झाकले जातात. सुरकुत्या पण लवकर येत नाही.एक लक्षात घ्या ज्या साधकांना दैवी तेज असतं.ती साधक लवकर म्हातारे होत नाही. जरी त्यांचे केस पिकलेली असली, तरी त्यांना लवकर सुरकुत्या येत नाही. कारण ती ईश्वराच्या भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झालेले असतात आणि ईश्वराचे दैवी तेच त्यांच्यावरती पडलेलं असतं. साठीमध्ये सुद्धा ते लवकर चाळीशीचे दिसतात.एवढे ते सौंदर्यवाण असतात. वातावरणातली देवता जेव्हा मंत्र जप देतात, तेव्हा त्या मंत्रांचा जप करून आत्म्याची दैविक शक्तीही वाढली जाते. आत्म्याची दैविक शक्ती वाढली की शरीराचा एक एक पार्ट जो असतो, नसा असतात त्या पूर्णपणे शुद्ध व्हायला सुरुवात होते.
शरीरामध्ये जे आजार आहेत ते आजार कमी व्हायला लागतात किंवा त्या आजारांचा काहीही त्रास त्या साधकाला होत नाही. तो आजार एका बाजूला असतो आणि साधक हा आनंद अवस्थेमध्ये एका बाजूला असतो. जेव्हा साधक एखादा मंत्राचा जप करतो, त्यावेळेला तो ज्या देवतेचे मंत्र जप करतो. त्या देवतेची जी काही दैविक शक्ती असते ती दैवी शक्ती त्या साधकाच्या आत्म्यामध्ये समाविष्ट होते.ती दैविक शक्ती इतकी वाढते, की त्या आत्म्यातून एक प्रकाश निघू लागतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ध्यानधारणा करताना जर देवाकडून काही मागितलं तर ईश्वर तुम्हाला सर्व गोष्टी पुरवतो. पण त्याच्याने तुमचं दैवी तेच कमी होते हे विसरू नका. म्हणून ध्यानधारणा करताना देवाकडून काहीच मागायचं नाही. देवाला सांगायचं देवा मला तूच पाहिजे आणि तूच माझ्याजवळ रहा. बाकी काही देवाकडे मागायचं नाही.
कारण, ‘ध्यानधारणा ही सर्वात मोठी भक्ती साधना आहे’. या साधनेद्वारे देव लवकर आपल्याला भेटतो आणि लवकर पावतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा. आकांक्षा आहेत, त्या वातावरणातील देव देवता जाणून घेतात आणि त्या इच्छा आकांक्षा ते पूर्ण करतात. पण त्याच्यामध्ये आपलं दैवी तेज हे पूर्णपणे कमी व्हायला सुरुवात होते. असं दैवी तेज वाढवायचं की आपलं दैविक तेज ओवर फ्लो झाला पाहिजे. समोरच्याला आपल्या दैवी तेजाची कल्पना आली पाहिजे. दैवी तेज टिकवून ठेवण्यासाठी मंत्र जप करत राहा. अखंड नाम जप नाही मंत्र जप करा. मंत्र जपमध्ये नाम शक्तीपेक्षा मंत्र जपामध्ये तीन पटीने शक्ती जास्त आहे. जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तेव्हा वातावरणातील देवदेवता मंत्र देतात. त्या मंत्रांचा अखंड जप केला असता आपली दैविक शक्ती वाढत जाते. त्या दैविक शक्तीने आपले सगळे आजार कमी व्हायला सुरुवात होतात. आपला बीपी डायबेटीस हाय असेल तर तो नॉर्मल व्हायला सुरुवात होते.केस गळत असतील तर केस गळायचे कमी होतात.
चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत असतील. तर सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्याला एक लखलखीत तेज सौंदर्य प्राप्त होतं. वातावरणाचे देव देवता आपल्याला मंत्र द्यायला सुरुवात करतात ते मंत्र इतके ‘पॉवरफुल’ असतात की, त्या एका मंत्राच्या जपाने सुद्धा आपलं दैवी तेज वाढत जातं. ‘ध्यानधारणा’ ही सर्वात उच्च अवस्थेची साधना भक्ती आहे. त्यामुळे ही साधना करताना तुमचे गुरु देखील उच्च अवस्थेचेच पाहिजे. तरच तुम्ही ध्यान धारणेमध्ये प्रगती करू शकता. जर दैवी तेज जर हवे असेल तर ध्यान धरणे शिवाय तुम्हाला दैवी तेज प्राप्त होऊ शकत नाही. दैवी तेज प्राप्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे ध्यान धारणा आहे.
तृप्ती पाटील
मुलुंड (इस्ट),मुंबई
========





