श्री काळभैरव तालीम संघ,आवासचे तालुका अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
श्री काळभैरव तालीम संघ,आवासचे तालुका अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग:(दि. २५ डिसेंबर): अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे अलिबाग तालुका कुस्तिगीर संस्था व जय हनुमान तालीम संघ वाडगावं यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुका अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य, रायगड भूषण प्रमोद मनोहर भगत सर यांच्या अथक परीश्रमातून व बहुमोल मार्गदर्शनातून घडलेल्या पैलवानांच्या श्री काळभैरव तालीम संघाने नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. आयोजकांच्या वतीने श्री काळभैरव तालीम संघ, आवास मधील यशस्वी पैलवानांना प्रशस्ती पत्रक व मेडल देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये श्री काळभैरव तालीम संघ,आवास मधील रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले यशस्वी पैलवान पुढील प्रमाणे —
*हौशी गट मुली*
१] समीक्षा पाटील [ ३६ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
२] मीरा पाटील – [ ३९ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
*हौशी गट मुले*
१] पवन मांजी [ ३८ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
*सब जुनियर गट मुले*
१] निशाल कुमार मांजी – [ ५१ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
२] प्रणव म्हात्रे [ ९२ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
*महिला वरिष्ठ गट*
१] युक्ता मढवी [ ५३ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
२] मनीषा गुरूम [ ६२ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
*केसरी महिला गट*-
१] सुरक्षा थळे [ ६५ ते ७६ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
*वरिष्ठ गट पुरुष माती विभाग*
१] शुभम म्हात्रे [ ८६ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
२] अंश धोंडसेकर [ ९७ कि.ग्रॅम ] – प्रथम क्रमांक
श्री काळभैरव तालीम संघ, आवासचे प्रशिक्षक प्रमोद मनोहर भगत सर व सर्व यशस्वी पैलवानांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आवास व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच कुस्ती प्रेमी कडून श्री काळभैरव तालीम संघ, आवास मधील सर्व पैलवान व प्रशिक्षक प्रमोद मनोहर भगत सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



