
0
4
8
2
9
0
श्रावण नाचत आला
रिमझीम रिमझीम
श्रावण नाचत आला
पूजतो नागपंचमी
नागोबा वारूळी डोले।
स्वातंत्र्याच्या उत्सवी
बरसल्या श्रावणसरी।।१।।
कानबाईचा महोत्सव
पहिल्या रविवारी उत्सव।
करा श्रावण सोमवारी
फराळाची मजा न्यारी।।२।।
सण नारळी पौर्णिमा
समुद्र भरूनी येती।
रक्षाबंधन आनंदे करती
भेट बहीण भावाची।।३।।
अष्टमी कृष्ण जन्मला
गोविंदा नाचत आला।
दहिहंडी उत्सवाला
बाल गोपाळांचा काला।।४।।
सारे उत्सव कराया
स्नेहल श्रावणसरी।
बरसती धरेवरी
झिमझिम झिमझिम।।५।।
गणेश नरोत्तम पाटील
नंदूरबार(स्नेहवलयकार)
===≠====
0
4
8
2
9
0



