0
1
9
8
2
2
मनात ठेवू नका दुरावा
आपुलेच म्हणूनी येती जवळी
उगीच कां तिटकारा करावा ?
बोलून लगेच व्हा मोकळे
मनात ठेवू नका दुरावा .
उच्च निच जो वाटून घेई
त्यांच्या संस्काराचा भाग
त्यावरी येती कठीण प्रसंग
तेव्हाच त्याला येतो जागं
रुसवाफुगवा नित्याचा खेळ
त्यातही घाला अचूक मेळ
मनधरणी करूनी त्यांची
वाचवा आयुष्याचा वेळ
क्षणभंगुर हे जीवन आपुले
कां उगीच मनी अहंम धरावा ?
रहावे मिळूनी सर्वांसोबत
मनात ठेवू नका दुरावा.
हेवेदावे नसता मनी
घडेल हातून आदर्श सेवा
जपण्या निट नातीगोती
मनात ठेवू नका दुरावा
प्रा दिनकर झाडे
गडचांदूर,जि.चंद्रपूर
======
0
1
9
8
2
2