0
1
9
8
2
1
फुशारकी
जिकडे पहावे तिकडे हल्ली
फुशारकीचे पेव फुटले
करणे धरणे काहीच नाही
नुसत्या बढाया मारत सुटले ॥
उसण्या प्रसिद्धीसाठी
जणू हपापलेले सगळे
भक्ष्य गळी उतरविणारे
टपलेले शुभ्र बगळे ॥
आयत्या बिळावर नागोबे
ठाण मांडून बनलेत
निर्लज्जपणाचा कळस
खोटे बोलण्यास निर्ढावलेत ॥
हातभर बी वितभर काकडी
सर्रास मांडलाय बाजार
फुशारकी मारणारांना
ऐकणारे झालेत बेजार ॥
आपलीच पाठ आपणच थोपटून
करती काळा बाजार
लाज सारी विकून खाल्ली
ईमान झालेय लाचार
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
1
9
8
2
1