0
4
8
2
8
6
नदी
केवढीशी असे ती
सुंदर नाजूक साजूकशी
ठरविले ध्येय भेटण्याचे
अथांग सागराशी
कधी आदळली उंच
कड्यावर खोल दरीला
बनली धबधबा केले
छिन्न विछिन्न स्वतःला
वाटेत कर्तव्य वनराई
शेत फुलवीत निघायचे
ठरलेले ध्येय तिचे
असे सागराला भेटायचे
किती ओढ असे मिलनाची
नदीची सागराला
धावते कशी डोंगर
दऱ्यातून त्यास भेटण्याला
मनुष्य जीवन असेच
कर्तव्यानी ध्येय गाठणे
मला वाटते नदीकडून
शिकावे जीवन जगणे
डॉ.श्री.बालाजी राजूरकर
हिंगणघाट,जि.वर्धा
0
4
8
2
8
6



