रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत निबंध स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत निबंध स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि ४): आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये बुधवार दि. २२ जानेवारी २०२५ रोजी रायगड पोलीसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत इ. ११ वी व इ. १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी धनराज फड सर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
*प्रथम क्रमांक–* जोगी सेजल किशोर [ इ. १२ वी कला ]
*द्वितीय क्रमांक–* कोळी देवकी शिवाजी [ इ. १२ वी वाणिज्य ]
*तृतीय क्रमांक–* म्हात्रे धृवी राजेंद्र [ इ. ११ वी कला ]
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी रायगड पोलीसांतर्फे प्रशास्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



