Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकिय

पुण्याच्या मोतीबागेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 7

पुण्याच्या मोतीबागेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संगीता ललवाणी,अजय प्रभू प्रमुख अतिथी

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे.दि.28 (प्रतिनिधी) रा.स्व. संघाचे प्रांत कार्यालय “मोतीबाग” येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक व एडीसॉफ्ट टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अजय प्रभू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.या प्रसंगी गोल्ड मार्ट ज्वेलर्सच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ललवाणी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या.

कसबा भाग संघचालक ॲड प्रशांत यादव, कार्यवाह राहुल पुंडे,
संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, कार्यवाह प्रसाद खेडकर हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. राजीव जोशी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार भारत मातेची प्रतिमा व राष्ट्रीय विचारांचे पुस्तक देऊन करण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधानाची प्रत आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ई-कचरा संकलन अभियानाचे उद्घाटन संगीता ललवाणी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी लोकांकडून नऊ ते एक या वेळेमध्ये ई-कचरा जमा करण्यात आला. शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, संघांचे स्वयंसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे