सिंग अलॉंग म्युझिक हब’ मधील दिग्गजांच्या गीतांनी अलिबागकर श्रोते मंत्रमुग्ध
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

‘सिंग अलॉंग म्युझिक हब’ मधील दिग्गजांच्या गीतांनी अलिबागकर श्रोते मंत्रमुग्ध
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि २३): शहरातील संतोष ल्हासे यांच्या गोल्डन हिट्स प्रेझेंट्स व सिंग अलॉंग म्युझिक हब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 22 /8/ 2026 रोजी पी.एन. पी नाट्यगृहात किशोर कुमार, येसुदास, हरिहरन व एस पी बाल सुब्रमण्यम या दिग्गज गायकांच्या गीतांची सुरेल बरसात करण्यात आली.
अलिबाग शहरात प्रथमच एखाद्या संस्थेच्या मदतीसाठी असा कार्यक्रम सादर करण्यात आला. आत्मनिर्भर पालक असो. ट्रस्ट संचालित विशेष मुलांची शाळा,अलिबाग या संस्थेच्या विकासासाठी हातभार लावावा या उदात्त हेतूने संतोष ल्हासे यांच्या गोल्डन हिट्स अलिबाग या संस्थेकडून चारिटी शोचे आयोजन करण्यात आले होते.
पीएनपी नाट्यगृहात सुरांनी सजलेल्या संगीत रजनी मध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध गायक अनिल कुमार घाडगे(व्हॉइस ऑफ किशोर कुमार )यांनी किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर हरिहरन, येसुदास, एस. पी. बालसुब्रमनियम या दक्षिणात्य गायकांचा आवाज अशी ओळख असणाऱ्या श्री संतोष ल्हासे यांनी या गायकांच्या गीतांचे बहारदार सादरीकरण मंजुषा कुलकर्णी व सेजल दूधसागर यांच्या साथीने केले. माननीय सौ. चित्रलेखा पाटील यांनी या सुरेल कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
आत्मनिर्भर पालक असो.ट्रस्ट विशेष मुलांची शाळाचे अध्यक्ष श्री.देशपांडे यांनी या संस्थेचा परिचय करून मदतीचे आव्हान केले व या कार्यक्रमासाठी भरघोस मदत करणाऱ्या देणगीदारांचे व अलिबाग करांचे मनापासून आभार मानले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री.चेतन पटेल,श्री मुकुंद तारदाळकर,सौ. रूपा ल्हासे,तसेच ग्रंथ मित्र नागेश कुलकर्णी व सिंग अलॉंग म्युझिक हब चे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.



