Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मृगसरी

कुसुम पाटील

0 4 8 2 9 7

मृगसरी

सरीवर सरी आल्या
वैशाख वणवा दाह उरी,
मातीला सुगंध दरवळला
नभ येईल माथ्यावरी…!!१!!

मृगसरी झरझर झरती
तरारती गवताची पाती,
पानावर चमकले मोती
राणी म्हणे चिंब चिंब होती..!!२!!

कुस उजवली धरतीची
बीजे रुजली नभ प्रीतीची,
धरती आतुर भिजून जाय
मोहिनी पडली शतरूपांची…!!३!!

झुळझुळ सरिता वाहती
तरुवरवेली फुलून येती,
पक्षी गाण आनंदात गाती
हिरवगार शिवार डोलती…!!४!!

सरीवर सरी कोसळती
अमृताने कलशभरती,
मयूर नेत्रातून थेंब स्त्रवती
फुले वेली रंगून जाती…!!५!!

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे