शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता
मुख्य संपादक राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*☄विषय : नारीशक्तीचा विजय☄*
*🍂शनिवार : ०७/ मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०८ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*नारीशक्तीचा विजय*
नारी नाही कशातचं कमी
देते आनंदी जीवनाची हमी
दुसऱ्यासाठी राबते नेहमी
भले स्वतःसाठी जगेल कमी
नारी म्हणजे अग्निज्वाला
अंधार छेदणारी दिव्यशक्ती
संघर्ष तिचा महान ध्येयाचा
कर्मावर तिची अफाट भक्ती
आई,जननी,शूर रणरागिणी
नमतोय तया चरणी माथा
ज्ञानज्योत पेटविली जिने
स्मरा सावित्री फुलेची गाथा
तिच्या डोळ्यांत चमके ध्येय
जग जिंकण्याची तळमळ
अडथळ्यांवर मात करूनचं
स्वकर्तुत्वाने मिळविते फळ
सन्मान करा नारीशक्तीचा
पंखाने घेण्या गगन भरारी
नारीशक्ती ही जगाची शान
दाखवते तिचा बाणा करारी
जागतिक महिला दिनाच्या
देता हार्दिक शुभेच्छा तिला
नारीशक्तीचा विजय असो
जयघोष गगनाला भिडला
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*
नारी गे तव शक्ती अपार
सोसलास अन्यायाचा प्रहार
अंतरात तव वन्ही चेतला
अनेक रुपे तव दैवी अपार
मनस्विनी तूच लिही गं
कर्तृत्वाचा इतिहास नवा
स्वयंसिद्धा तू एकटी भारी
कुणाचा तुज आधार हवा?
जोखड ते जुन्या रुढींचे
पायी तुझ्या जे जखडले
तोडून टाक निर्भयतेने
दिसती बघ ती प्रकाश फुले
निर्भयांचा बळी घेणारे
लांडग्यापरी जगी माजले
तया शासन करी रागिणी
स्वयंसिद्धा तू गं प्रज्वले
नको राहू तू मूर्ती बनूनी
नको भुलू तू स्तुतीसुमना
रुप घेवूनी अष्टभुजेचे
सिध्द होई असुरमर्दना
पंख पसरून घेई भरारी
नभ निळाईत क्षितीजा पार
प्रगतीचा आलेख उंचावत
यशोशिखरी होशी स्वार
नारीशक्तीचा विजय जाहला
दिशादिशांत गाथा गाजली
कर्तृत्वाचे पंख लेवूनी तिने
क्षितीजे किती काबीज केली
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*
नाही वाटत आज
जगावे जगी बिनधास्त
टपले असता कावळे
जगणेच झाले त्रस्त…१
कुठं हरवली सुरक्षा
नाही मिळे मानपान
शिकले फक्त पुस्तकी
म्हणे स्त्री-पुरुष समान…३
स्त्री म्हणे कंदीलाची काच
जपावे तिज अलगदपणे
आज आले वाटी तिच्या
फक्त अत्याचार सोसणे.. ३
शिकून सवरून बघा
झाली आहे सबला
अस्तित्व आजही धोक्यात
म्हणून वाटे ती अबला…४
काय पाप केले तिने
स्त्री म्हणुनी जन्मली
सारे धोके पत्करी
नाजूक ती अबोली….५
एक काळ होता
माझ्या त्या शिवबाचा
लेक होती जिजाऊची
होई सन्मान आदराचा…६
नव्हत्या नजरा वाईट
करी संचार मुक्तपणे
वाटे आधार साऱ्यांचा
बागडी पाखरे हर्षाने…७
अत्याचार, बलात्कार
कानी शब्द नको आता
होळी केली जीवनाची
उरली नाही शिल्लक ममता..८
का दुःखे सोसावी
फक्त जगी स्रियांनी
करा आदर तिचा नेहमी
जागतिक महिलादिनी…९
होईल का कधी तरी
नारीशक्तीचा विजय
टाकीत जाऊ पुढे पाऊले
नको कधीच पराजय…१०
*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय !*
अबला म्हणू नका तिला, ती सामर्थ्याची ओळख आहे,
तिच्या कर्तृत्वाच्या तेजाने उजळलेली ही सृष्टी आहे.
तिच्या पावलांनी इतिहासाला नवी दिशा मिळते,
तिच्या स्वप्नांनी उद्याचे सुंदर विश्व घडते.
संघर्षांच्या वाटेवर ती कधीच थांबत नाही,
अपयशाच्या सावलीतही तिची उमेद हरवत नाही.
तिच्या धैर्याच्या प्रकाशात नव्या युगाचा होतो उदय,
जगाला प्रेरणा देणारा — नारीशक्तीचा विजय!
कधी ती दुर्गा बनून संकटांवर प्रहार करते,
कधी ममतेच्या सागराने जगाला आधार देते.
तिच्या सामर्थ्याच्या तेजाने उजळतो प्रत्येक सूर्योदय ,
जगाला नवी दिशा देतो — नारी शक्तीचा विजय!
अन्यायाच्या अंधाराला ती प्रकाशाची वाट दाखवते,
स्वतःच्या सामर्थ्याने जगाला नवे बळ देते.
जिथे नारीचा सन्मान, तिथे यशाचा नवा उदय,
कारण तिच्या धैर्यानेच घडतो नारीशक्तीचा विजय!
*मोनाली शिंदाडे*
*कर्वेनगर, पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*
आकाशी घेतलीस तु , उंच विहंग भरारी।
प्रेरणा सामर्थ्य दिशा ,आदिशक्ती आहे नारी।।
रुपी जिजाऊ सावित्री ,ती रमाई लक्ष्मीबाई।
जगी जननी म्हणूनी, नीतिमूल्यांची मुक्ताई।।
वात्सल्य प्रेम ममता, तुझे गाऊ किती गूण।
आकार मिळे जीवना ,सुसंस्काराला जपून।।
अबला झाली सबला ,नारी शक्तीचा विजय।
संविधान बा भीमाचे , केले सर्वांना निर्भय।।
तुझे भूषण लेकरा ,तुझा त्याग आशीर्वाद।
ओवाळीतो ह्रदयाने,अन घालतो मी साद।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि,यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह,*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*
आहे नारीशक्तीचा. विजय
तिच्या कलागुणांचा करा आदर
सहनशीलता तिच्या अंगी मोठेपण
माया ममतेचा अथांग सागर
नारी अद्यावत विश्वाची जननी
देते ती मायेचा पदर
करू. तिचा. सन्मान
कर मानवा तिचा आदर
नका विसरू तू तिचा
अमूल्य वात्सल्याचा ठेवा
रूप तिचे आईचे शक्तीचे
करते आयुष्यभर सेवा
येता कुटुंबावर संकट
तेव्हा देई घराला आधार
नम्र शीतल होऊन मानवा
मान तिचे आभार
बीज सृजनांचे असता
ठेवते. कुशीत लपवून
घेता तिच्या कष्टाचा आढावा
जातात आपले डोळे दिपून
भूक नसते संपतीची तिला
प्रेम स्नेहाचा असावा ओलावा
तिचा आदर तिथ्याने कधीतरी
मनी आपल्या फुलोरा फलावा
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*
स्त्री शक्तीचा करू या जागर
चैतन्याची असे ती सागर
ती नच आता कुठेच कमी
विश्वासाची तुझी हमी
शक्ती तुझ्यात अगाध वसे
आत्मविश्वास तझ्यात ठसे
गगनात घेई उंच भरारी
कर्तृत्वाची तू करारी
सहन शीलतेची दर्या तू
प्रेम,त्याग,ममता करूणा तू
रूप तुझे किती अनंत
जग तुझ्यामुळे भाग्यवंत
कला,विज्ञान असे तू निपुण
संस्कृतीचे सुंदर भवन
तुझ्याच मुळे जगी चैतन्य
कारुण्याचे तुझे नैन
नारी ही आदिशक्ती
स्त्री शक्तीची करू या भक्ती
नारी शक्तीचा विजय असे हा
त्रिवार वंदन नारी शक्तीला
*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*झिंगाबाई टाकळी,नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*नारीशक्तीचा विजय*
अवघड बाई तुला समजणे तुझे रूप लय भारी
कधी माता, बहीण, भार्या कधी दूर्गा बनून तारी
तू असतांना घरात सुगंध दरवळतो
तू नसताना घराचा कोपरा कोपरा हळहळतो
चेतना घराची तू तुझी उपस्थितीच लयी न्यारी
कधी माता..
रांधा वाढा उष्टी काढा, पणती सारखी जळते
गृहीत धरतात ग सारे आमच्यातील तू कुणाला कळते
विटंबना आम्हीच करतो आज म्हणतो ग सॉरी
कधी माता..
जिवापाड करते प्रेम अन त्याग ही केवढा
थकली तरी सुगंध देते जसा बहरला अंगणी केवडा
नारीशक्तीचा विजय मनवावा दारोदारी
कधी माता..
अवघड बाई तुला समजणे तुझे रूप लयी भारी
कधी माता, बहीण, भार्या कधी दुर्गा बनून तारी
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



