
0
6
5
1
4
8
ओढ्यावरून
आमच्या गावाच्या शेजारी
ओढा झुळझुळ वाहतो
पावसाळ्यात सारे सवंगडी
ओढा बघायला जात असतो
गावातील बाया कपडे घेऊन
ओढ्यावर धुवायला जातात
सुंदर निर्मळ ओढ्याच पाणी
शेतातून वाहत वाहत जात
ओढ्यावरून जातांना खूप
हिरवीगार झाडे, फुले आहेत
बाजुलाच नदी वाहतांना दिसते
ओढा निसर्गाची शोभा वाढवते
मी आईसोबत रोज ओढ्यावर जातो
हिरवाईने नटलेला रम्य निसर्ग बघतो
ओढ्याच थंडगार निर्मळ पाणी बघून
मन तिथेच रमते खूप आनंद वाटतो
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
6
5
1
4
8



