कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
अभिलाषा; मायादेवी गायकवाड
0
4
8
3
0
0
अभिलाषा
नित्य,कर्म करावे, पुण्याचे
फळाची,अपेक्षा करू नको,
मिळाला आहे, मानव जन्म
त्याचा तू,नरक करू नको.
कास सत्याची,धर मानवा
खोट्याशी नमते,घेऊ नको,
बदला घेण्याच्या, रागापायी
मार्गात काटे,पसरू नको.
गोरगरीबांची उपेक्षा, करून
घास मुखातला हिसकू नको.
दानत्वाच्या अविर्भावात पुण्याची
‘अभिलाषा’ व्यर्थ करू नको.
जास्तीच्या हाव अपेक्षेपाई
पितळ ज्ञानाचे उघडे नको,
हसे होईल जगात,असा
ढामढोंग व्यर्थ बाळगू नको.
जेवढे अंथरून आहे तेवढेच,
पांघरून ओढून ताणू नको,
व्यर्थ,अभिलाषा धरून तू
पाय उघडे, कधी पाडू नको.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
=========
0
4
8
3
0
0



