इसासनीत सर्रास दारू विक्री! पोलीस मात्र गप्प..?
खुले आम दारू विक्रीला कुणाचा वरदहस्त?
इसासनीत सर्रास दारू विक्री! पोलीस मात्र गप्प..?
खुले आम दारू विक्रीला कुणाचा वरदहस्त?
तालुका प्रतिनिधी हिंगणा
हिंगणा : (दि २२) नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इसासनी वागधरा परिसरातील भीमनगर भागात खुलेआम देशी व इंग्लिश दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
परिसरातील माजी सरपंच संतोष कटरे यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांना थेट फोनद्वारे कळवले. मात्र अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याचे कटरे यांचे म्हणणे आहे. यापुढे त्यांनी गंभीर आरोप करत स्पष्ट केले की, या बेकायदेशीर दारू विक्रीतून मोठ्या प्रमाणात “देन” पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्रीवर कुणाचा वरदहस्त आहे. याबाबतही परिसरात चर्चा सुरु असून, बेरोजगारीची टांगती तलवार कायम असूनही बेरोजगार तरूण व्यसनाधीन होतांना दिसत आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या या ‘दारू’ अड्डयावर पोलीस प्रशासन कारवाई करणार का असा सवालही नागरिक विचारत आहे.



