0
4
8
2
9
0
बायको
बायको म्हणजे, काय असते रे।
प्रसंगी मैत्रीण , माय असते रे।।
सुखात दुःखात,सोबत राहून।
वासरात तशी, गाय असते रे।।
काळजी करते,संसारात सदा।
लुळे पांगळ्यांना ,पाय असते रे।
कोण आले गेले,घरी उणे सुणे।
अंगणात शोभा ,भाय असते रे।।
कधी अर्धपोटी, कैकदा उपाशी।
तरीही मनानी , हाय असते रे।।
कुंकवाचा टीळा,जपते ह्रदयी।
नवर्याला खरी,बाय असते रे।।
किती गुण गावे,तीच्या थोरवीचे।
रोज नव्याने , अध्याय असते रे।।
कर्माचे धर्माचे ,आयुष्य पावती।
जीवनी पत्नीच ,न्याय असते रे।।
गोवर्धन तेलंग
ता.पांढरकवडा
=========
0
4
8
2
9
0



