Breaking
ई-पेपरकवितानागपूरबीडविदर्भसाहित्यगंध

प्रथम पुण्यस्मरण बाळा

राजश्री मिसाळ ढाकणे जिल्हा बीड

0 4 8 2 9 3

प्रथम पुण्यस्मरण बाळा

बघता बघता वर्ष संपलं
गेला सोडून माझा बाळ
फुलण्याआधीच गुलाब
कसा टपला क्रूर काळ…

एका आईचा टेडी सुंदर
देवालाही आवडला काय
कॅडबरी चॉकलेटला आता
पहिल्यासारखी चव नाय…

आई बाळाच्या घट्ट नाळेलाच
असे कसे हो अलगद तोडले
गाडीतून फिरविण्याचे प्रॉमिस
निरागस बाळाचे देवाने मोडले…

तूच होतास खरा किस डे
येता जाता वर्षाव असायचा
घेताच कुशीत बाळा तुजला
आनंदाने तू किती हसायचा…

प्रथम पुण्यस्मरण श्रीकृष्णाचे
विनम्रभावे प्रार्थना शिवचरणी
जन्म मरणाचा फेरा नको देवा
माझ्या बाळाच्या पुन्हा जीवनी…

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
=========

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे