Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सिर्सी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा क्र १ येथे वार्षिक स्नेहसंमेलन

प्रतिनिधी; अखिल रोडे उमरेड

0 4 8 2 9 3

सिर्सी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा क्र १ येथे वार्षिक स्नेहसंमेलन

विद्यार्थ्यांच्या भव्य आनंद मेळावा व पालक मेळावा

माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार

प्रतिनिधी; अखिल रोडे

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर/उमरेड: सिर्सी जिल्हा परीषद शाळा क्र १ येथे स्नेहसम्मेलन, आनंद मेळावा, पालक मेळावा मेवाला व माजी विद्याथ्यावा मेळावा दिनांक 26 व 21 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला. सकाळी 7.30 वाजता मा. वंदनाताई बुटे सरपंच ग्रा.प. सिर्सी यांचे तसेच मा. मिलिंदजी सुटे समाजकल्याण सभापती जि.प. नागपूर तसेच इतर मान्यवर मंडळी यांचे प्रमुख उप‌स्थित मा. प्रमोद‌जी वानखेडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे हस्ते ध्वजारोह‌णाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. चंदुजी लटारूजी दादडे उ. श्रे. मुख्याध्यापक यांनी केले.

26 जानेवारी 2025 ला दुपारी 2.00 वाजता वार्षिक स्नेहसंम्मलनाचे उद्‌घाटन मा. मिलींदजी सुटे मा. सभापती यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान सिसी गावच्या सरपंचा मा. वंदनाताई बुटे भुषविले. उद्‌घाटन सोहळ्या करीता मा. सावित्रीताई ढोबळे माजी. म‌हिला बालकल्याण सभापती जि.प. नागपूर तसेच दादारावजी मांडसकर प.स. सद्यस उमरेड मा. प्रमोदजी वानखेडे अध्यक्ष शा.व्य. स. सिर्मा व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्‌घाटना नंतर सर्व मुलामुलीनी बहारदार सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले, नृत्य, नाटीका, नकला यांच्या त्यात समावेश.

दिनांक 27.01.2025 ला सकाळी 10.00 वाजता मा. तिनधसे सर प्राचार्य व. ना.कृ.वि. सिर्सी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली आनंद मेळाव्याचे उद्‌घाटन केले. आनंद मेळावा व पालक मेळावा २.०० वाजे पर्यंत आनंदीमय वातावरणात पार पडला, यानंतर माजी विद्यार्थी मेळावाला सुरुवात झाली. या मेळाव्यासाठी शाळेत श्री जगन्नत भोयर नि.खं.वि. अधिकरी काशीनाथजी डोमेवाले. मुख्य अभियंता, श्री. चंद्रशेखर घोडे अभियंता पाणी पुरवठा विभाग, श्री चंद्रशेखर राऊत प्राचार्य शासकीय आय. टी. आ असे अनेक नामवंत विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांनी या शाळेतील अनुभव आपल्या विचारातून व्यक्त ऐले. या कार्यक्रमाचे संचालन श्री. चंदनजी सायरे स. शि. यांनी केले. या सर्व मुख्याध्यापक श्री चंदुजी दांदडे यांच्या हस्ते माजी विद्यार्थाचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

दोन दिवसीय स्नेहसम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी.श्री. दांदडे सर, श्री सायरे सर, सौ. वनिता सायरे. सौ. संध्या शेगोकर मॅडम बाकडे मॅडम, रामटेके मॅडम, आत्राम सौ. स्वाती नारनवरे मॅडम यांनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे