
0
4
0
9
0
3
स्पर्श विश्वासाचा
स्पर्श विश्वासाचा
वाढवी मनोबल॥
दुःख दूर होती
जीवनातील सकल॥॥॥॥
स्पर्श विश्वासाचा
आत्मविश्वास वाढवी॥
देई जगण्याची उर्मी
हताश जीवाला॥॥॥॥
स्पर्श विश्वासाचा
नवचैतन्य देई॥
नैराश्याला सारी
दूर मनातूनी॥॥॥॥
स्पर्श विश्वासाचा
असतो आश्वासक॥
सर्व विवंचना
क्षणात सारक॥॥॥॥
स्पर्श विश्वासाचा
वेळीच व्हावा॥
हतबल होण्याआधी
उभारीने तरावा॥॥॥॥
स्पर्श विश्वासाचा
श्रमपरिहार करतो॥
त्रस्त मनाला त्वरीत
देतो विसावा ॥॥॥॥
डाॅ.नझीर शेख राहाता
अहमदनगर
0
4
0
9
0
3





