Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

मराठी काव्यरचना कार्यशाळा यशस्वी; वसुधा वैभव नाईक यांचे मार्गदर्शन

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 6 2 0 1 5

मराठी काव्यरचना कार्यशाळा यशस्वी; वसुधा वैभव नाईक यांचे मार्गदर्शन

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

पुणे, (दि.29): वंडर स्कूल, कात्रज या संस्थेचे संस्थापक माननीय प्रा. डॉ. सतीश कदम सर यांच्या दूरदृष्टी, शैक्षणिक विचार आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली. तसेच हा शैक्षणिक प्रवास पाच शाखेमध्ये होत आहे. “शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून सक्षम समाज” या ध्येयाने प्रेरित आहे.शाळेची माहिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सातत्यपूर्ण कार्याचा परिणाम आहे.

आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कदम सर नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. त्यातील हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम होता की ज्यात शिक्षकांना त्यांचे कला गुण, सर्जनशीलता,ओळख होऊन आपली प्रगती करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली गेली होती. या कार्यशाळेमध्ये कविता लेखन, कल्पनाशक्ती, कविता कशी वाचायची?कविताचे सादरीकरण कसे करायचे? तसच प्रश्नमंजुषा,लेखन, कौशल्य,वाचन कौशल्य अभिव्यक्ती, इत्यादी सर्व संवाद साधून या वर प्रकाश टाकण्यात आला.

वसुधा नाईक यांनी स्वतःच्या अनुभवातून ही कविता कार्यशाळा घेतली. कविता शिकत नाहीत तर ती मनात जागवतात. कविता म्हणजे नुसते यमक जुळलेली वाक्य नाही, तर मनाला जाणवलेले स्पर्श, अनुभव, भावना, घटना असतात. सुखदुःख, रागद्वेष,मस्तर माया,प्रेम,जिव्हाळा हे सर्व शब्दबद्ध जेव्हा करता येते तेव्हा आपली कविता तयार होते, लेख तयार होतो आणि लेख,कविता रसिकांपर्यंत पोहोचल्या की त्यांच्या मनावर राज्य करतात.यातूनच कवितेचा जन्म कसा होतो हे प्रत्यक्ष उदाहरणे देऊन सांगितले.

कवितांचे विविध प्रकार समजावून सांगितले भावकविता, निसर्ग कविता, बालकविता,बडबड गीते, देशभक्तीपर गीते, सामाजिक कविता, विनोदी हास्य कविता, अंगाई गीत, चारोळी, अभंग, ओवी, मुक्तछंद कविता, वृत्तबद्ध कविता, लावणी इत्यादी काव्यप्रकार थोडक्यात समजावून सांगितले आणि त्या त्या प्रकाराची गीत गाऊन दाखवले.

या कवितेच्या कार्यशाळेसाठी शाळेतील एकूण 26 शिक्षक हजर होते. त्यांची नावे खालील प्रमाणे.
1 सारिका खामकर
2 मनाली कदम
3 प्रतिभा कदम
4 अमृता सोनावणे
5 ऋतुजा मालुसरे
6 समिना इमानद
7. मयुरी कोरे
8. सारिका सोनावणे
9. अश्विनी अवसरे
10. सुरभी जाधव
11. पूनम पायगुडे
12. अंजली गुणिजन
13. अंनी श्रीवास्तव
14. सरोज शेट्टी
15. नीलम शिर्के
16. मीनाक्षी बोरसे
17. स्रिस्ती शर्मा
18. शीतल यादव
19. रेणुका सुतार
20. समोया भाईजान
21. स्नेहा कदम
22. गौरी जाधव
23. सुनीता पाटील
24. रोजीना बीबी
25. प्रतीक्षा कुंभार
26. रुपाली मोरे

खूप छान एन्जॉय केला छान वाटलं आणि कवितेची कार्यशाळा अतिशय आनंदात संपन्न झाली. सर्व शिक्षक छान रमले होते. सर्वांनी उत्तम साथ दिली. खूप छान एन्जॉय केला तसेच शिक्षकांनी त्यांच्या आवडीच्या कविता सादर केल्या.

मा. कदम सरांनी वसुधा नाईक यांचा सत्कार केला. तसेच वसुधा नाईक यांनी कवितेच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना ‘ प्रमाणपत्र ‘वाटप केले. सर्व मावशींचे वसुधा यांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 1 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे