
मैत्रीतील प्रेम
कधी कधी काही गोष्टी नको वाटतात मात्र त्या घडून जातात. प्रेम हा शब्द नव्हे तर जीवनाचा आधार ही मानल्या जातो.
मेघा ही खूप साधी भोळी मुलगी असून ती स्वाभिमानी होती तिच्या स्वभावात गोडवा, दिसायला जणू अप्सरा ,काळे भोर लांब मुलायम केस , गुलांबाच्या कोवळ्या पाकळी सम ओठ, लांभ बांधा जेवढी दिसायला सुंदर तेवढीच स्वभावात ही सुंदरता .मात्र तिला तिच्या सौंदर्यावर जराही गर्व नव्हता, तिच्या अंगी असलेल्या कौशल्या वरून तिच्या सौंदर्याची परख करावी असे तिला वाटायचे. प्रेम या गोष्टीत कधी तिने विश्वास केला नव्हता प्रेम म्हणजे जणू एक बंदिस्त नात आहे असे तिला वाटायचे .तिच्या मैत्रिणी ना ती नेहमी म्हणायची प्रेम वगैरे माझ्या साठी कुठ बनल आहे गं मला नको आहे कोणी माझ्या आयुष्याची दोर पकडणारा. मला माझ्या आयुष्याची दोर कुणाच्या हातात द्यायची नाही. मला नको ग प्रियकर , असल्या फालतू गोष्टीकडे माझा तोल कधी जाणार नाही एवढं मात्र नक्की, असे ती तिच्या मैत्रिणीला नेहमी म्हणायची . मात्र एक सुरेश नावाचा मुलगा तिच्या कॉलेज मध्ये आला दिसायला सुंदर आणि बुध्दीने सुद्धा हुशार, शिक्षकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तो द्याचा त्याला पाहून मेघा त्यांच्या कडे बघतच राहायची व स्वतःशीच बोलायची किती हुशार मुलगा आहे हा, सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक असे उत्तर देतोस, मानाव लागेल याला. सरांनी मेघा ला उभे केले व प्रश्न विचारले मात्र मेघा त्या प्रश्नाला निउत्तर झाली .तेव्हा वर्गात सर्वत्र हास्याचा गोंधळ उडाला होता कारण कधी न चुकणारी मेघा आज चुकली होती . याचं काही ना आश्चर्य वाटू लागलं होत तर कुणाला फार छान वाटत होते ,की बर झालं उत्तर नाही आले नाही तर सरांनी परत गुणगान गायले असते.
मेघा ला फार वाईट वाटत होते मात्र मेघा काही न बोलता उभी राहली मात्र सुरेश याला वर्गातल्या मुलाचे हे वागणे पटले नव्हते .तो सर्वांना म्हणाला , का हस्तात तुम्ही तिने उत्तर नाही दिले म्हणून का? मात्र हाताची पाचही बोट सारखी नसतात या जगात कोणताच माणूस परी पूर्ण नाही .तिने तर फक्त एका प्रश्नाचे उत्तर नाही दिले एवढ्याश्या कारणास्थ हसतात हे बर नव्हे. तेवढ्यात सर मनाले सुरेशचे म्हणणे अगदी बरोबर आहे .चला सर्वांनी आपल्या कामात लागा , पुढील तासिके साठी मॅडम ला पाठवते येवढे म्हणून सर वर्गातून बाहेर गेले .सुरेशच्या बोलण्यावर मेघा सुरेश ला म्हणाली तुझे फार आभार प्रत्येक मुलगा तुझ्या सारखाच असावा .सुरेश मेघा ला हसून म्हणाला आभार वगैरे नको मानू मी नेहमी सत्याचीच बाजू घेतो.
कुणावर कारण नसताना हसलेल मला आवडत नाही .मेघा ला त्याच्या बद्दल फार आदर वाटू लागला होता. काही दिवसांनी त्यांच्यात मैत्री झाली ते ऐक मेकांना समजू लागले होते .सुरेशला मेघाचा स्वभाव फार आवडायला लागला होता .जणू तीच त्याला फार आवडायला लागली होती .मात्र सुरेश तिला सांगू नव्हता शकत, त्याला वाटत होत त्यांनी तिला त्याच्या मनातील भावना सांगितल्या तर त्यांच्यातल्या मैत्रीला तळा जाऊ नये. मात्र त्याच्या मनात यायचं , मेघाला सांगावं की नाही मात्र तो स्वतःशीच कुचबुज करायचा .जेव्हा मेघा कॉलेजला यायची नाही तेव्हा सुरेश चे पण वर्गात मन लागायचे नाही .जणू त्याला मेघाच्या असण्याची सवय झाली होती .
एके दिवशी मेघा कॉलेजला आली नव्हती तेव्हा सुरेश मेघाच्या मैत्रिणीला रूपाला विचारतो मेघा का आज आली नाही ? तेव्हा रूपा सुरेशला म्हणते , काही कल्पना नाही ती आज का नाही आली. सुरेश ठीक आहे म्हणत निगुन जातो . दुसऱ्या दिवशी सुद्धा मेघा कॉलेजला गैरहजर असते तेव्हा सुरेश परत रूपाला विचारतो आज पण मेघा आली नाही, गं काय झाले ,तेव्हा रूपा त्याला म्हणते की अरे मेघा ची प्रकृती बिघडली असल्या कारणास्तव ती येत नाही आहे .तेव्हा सुरेश ला फार वाईट वाटत . तो स्वतःलाच म्हणतो अरे बापरे मेघा ची प्रकृती बरी नाही ,मला तर ठाऊक पण नव्हतं .मी तिची जराही चौकशी केली नाही , कशी असेल ती ,तिला काय वाटत असेल माझ्याबद्दल, मी कसा मुलगा आहे, मी तिच्या घरी जायला हवं होत पण तिच्या घरचा पत्ता पण माहित नाही . त्याला मेघाची फार चिंता लागली होती.
मेघाला पण सुरेशची आठवण येत होती. बरेच दिवस झाले मी सुरेश सोबत बोली नाही त्याला माहित असेल का ? माझी प्रकृती ठीक नाही म्हणून .किती साधा आणि सरळ मुलगा आहे ,तो सर्व मुलांन मधून वेगळ्या विचाराचा आहे .त्याच्या मनात प्रत्येक का विषयी आदर आहे , चुकल्यावर आवाज उठवणार आहे , माझी किती काळजी घेतो , पण मला त्याच्या बद्दल येवढं कसा काय लगाव झाला मला आता त्याच्या शिवाय करमत पण नाही .का? असे का होतय कुणास ठाऊक , असे ती तिच्या तब्येतीची चौकशी करायला आलेल्या तिची मैत्रीण रूपा तिच्या सोबत बोलते .रूपा म्हणते मेघा सुरेश रोज तुझ्या विषयी विचारतो तु कशी आहे आणि येवढ्यात त्याचे कॉलेज मध्ये पण काही मन नाही लागत आहे ,कदाचित तुझी कमी त्याला जाणवत असेल .मेघा म्हणते खरच का ग रूपा म्हणते हो ग मेघा इकडे तुला सुरेश ची आठवण येते व तिकडे सुरेश ला तुझ्या शिवाय करमत नाही. नेमक काय चालू आहे ग असे म्हणत रूपा मेघा ची मस्करी करते.मेघा लाजत म्हणते की तू समजते तस काही नाही बर का. रूपा काही तरी गडबड आहे तू हो मन की नाही .मुलगा चांगला आहे, तुला हवा तसा मुलगा आहे. तुझा बाजूंनी नेहमी उभा असतो आणि त्याच्या शिवाय तुला पण करमत नाही .मेघा तिला काही पण नको ग बोलू तू समजते तस काही नाही .तुला चांगलच ठाव आहे मी प्रेम वगैरे काही करू शकत नाही,माझ्या कल्पने पलिकडल आहे .रूपा त्यावर तिला म्हणते मेघा जरा तुझ्या मनाला विचारुन बघ तर तुझ मन काय काय बोलते तर तुझ्या सोबत. तेवढ्यात मेघा चे बाबा येतात व म्हणतात छान मैफिल सजली वाटत मैत्रिणी ची बर असू द्या, काय ग मेघा कस वाटत? अगदी बर वाटत ना . मेघा म्हणते हो बाबा मी ठीक आहे मला बर वाटत बाबा एक विचारू मी उद्या पासून कॉलेज लां जाऊ का ? मला घरी करमत नाही ,माझा अभ्यास पण बराच मागे गेला मेघा चे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणतात की माझ्या बाळा तू आधी पूर्ण पणे बरी हो मगच तू कॉलेजला जा. मेघा म्हणते बाबा मी ठीक आहे जाते न बाबा मी कॉलेजला उद्या मेघा चे बाबा तिला म्हणतात बाळा मी आणि तुझी आई दिवस रात्र येवढं कष्ट उपसत असतो ते कशा साठी तुझ्या भविष्यासाठीच ग.मला ही वाटत माझी लेक खूप मोठी अधिकारी बनवा, बाळा एक सांगू तुला वाटेल ते कर तुला वाटेल तेथे जा मात्र माझ्या लेकी तुझ्या बापाची पगडी कधी खाली नको होऊ देऊ , तुला हव तस जग तुला संपूर्ण आभाळ भरारी घेण्यासाठी खुले केले मी मात्र माझ्या पाखरा तुझ्या बापाच्या स्वाभिमान नमते होईल असे कधी कृत्य करू नको तू जन्माला आली तेव्हाच मी तुझ्या आईला म्हनालो होतो ,माझ्या लेखीला मोठी करेल, ती माझं नाव जगी चमकवेल आणि माझी एकच इच्छा आहे माझ्या पाखरा तुला जसे मी राजकुमारी सारखे वाढवले तसेच तू लग्न करून गेल्यावर तू तेथे राणी सारखे राहावे.
तुझ्यासाठी राजा बघण्याच माझं स्वप्न मी पूर्ण करेल .तुझे कन्यादान करून मी स्वतःला पुण्यवान समजेल बाळा. विश्वास ठेव तुझ्या या बापावर मी तुझ्या साठी संपुर्ण जगा सोबत लढायला तयार आहे .मेघा तिच्या बाबाला म्हणते बाबा तुम्ही मला संपूर्ण आभाळ भरारी घेण्यासाठी खुले करून दिले बाबा मी खूप मन लाऊन चिकाटीने अभ्यास करेल, तुमच्या शब्दाला मी कधी खाली जाऊ देणार नाही . बाबा तुम्ही दोघे ही माझ्या साठी जे दिवस रात्र कष्ट करता त्याची मला जान आहे .बाबा माझ्या वर विश्वास करा मी तुमच्या स्वाभिमानाला कधी ही तळा जाईल असे कृत्य मी कधी करणार नाही .तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न बाबा.मेघाचे हे बोलणे ऐकून तिच्या बाबाच्या डोळ्यात पाणी आले व तिला म्हणतात हो रे माझ्या पाखरा मला तुझ्या वर पूर्ण विश्वास आहे . बर चालू द्या तुमच्या गप्पा असे म्हणत मेघाचे बाबा कामावर जातात व मेघा रूपाला म्हणते रूपा मी तर पूर्ण गोंधळून गेले ग, मला काही सुचे नासे झाले आहे , एक कडेला सुरेश व दुसऱ्या कडेला बाबाचे माझ्या बद्द्ल असेल्या अपेक्षा त्यांचा स्वाभिमान काय करावं काही कळत नाही रूपा ते काही असो मी माझ्या वडिलांच्या कष्टांना जाणतो, त्यांच्या वेदनाशी मी परिचित आहे .मी माझ्या मनात असलेल्या सुरेश प्रती भावना मी माझ्या मनातच ठेवते सुरेश माझा चांगला एक मित्र आहे .
एक सांगू रूपा प्रेम साथ सोडते ग मात्र मैत्रीचं नात कधी साथ सोडत नाही ते सागरा सम अथांग असत. म्हणून रूपा मी माझ्या आणि सुरेशच्या नात्याला प्रेमाचं नाव कधीच देणार नाही.रूपा म्हणते अग पण सुरेश च काय ? तुझ्या प्रती त्याच्या असलेल्या भावंनांच काय ? मेघा तिला म्हणते मी बरी झाले की कॉलेज ला आल्यावर सुरेश ला समजाऊन सांगेल .मला ठाऊक आहे ग सुरेश एक समजूतदार मुलगा आहे तो नक्की समजेल .त्याच्या साठी पण मैत्रीच नात आमचं फार महत्वाचं आहे .तो या नात्याला प्रेमाचं नाव देऊन कधीच तळा जाऊ देणार नाही .रूपा म्हणाली हो मेघा तू म्हणते ते अगदी बरोबर आहे .
अश्या प्रकारे सुरेश व मेघा यांच्यातील एका मेका प्रती असलेल्या भावना कधी बाहेर आल्या नाही व मेघा ने त्यांच्या मध्ये असलेल्या मैत्रीला प्रेमाच्या बंधनात बांधून कधी तळा जाऊ दिला नाही .प्रेम अपुरे राहले मात्र मैत्रीचं नातं पूर्ण झालं .
कु.कोमल वसंतराव साखळे
तळेगाव (शा. प.) ता. आष्टी, जि. वर्धा.
=============



