0
4
8
2
8
6
सावित्रीमाई
सावित्रीमाई,
आज काळीज तीळ तीळ तुटले,
ज्या वाड्यात,
ज्यांच्या हाती कलम देऊन
क ख ग गिरवायला लावलस …
त्याच वाड्यासमोर…
आणि
ज्या रस्त्याने तू शेणामातीचा मारा सहन केलस
त्याच रस्त्यावर बसून…
तुझ्याच लेकी म्हणून मिरविणाऱ्या…
सुशिक्षित 31000 महिलांनी
गगनभेदी आवाजात ‘अथर्वशीर्षचे’ पठण केले,
भराजरी वस्त्रे आणि दागदागिने परिधान करून…
माई बरे केले तू!
लिहिण्या वाचण्याचा हक्क मिळवून दिला…
पितामह म्हणाले होते…
विद्येविना मती गेली
इथे तर विद्या असूनही मती गेली आहे…
- परशराम गोंडाणे, नागपूर
0
4
8
2
8
6



