
0
6
5
6
0
4
भाऊबीज नाते जिव्हाळ्याचे
बहिण भावाच्या निर्मळ नात्याचा
ओलावा माहेरच्या मायेचा
निरंजनाचे ताट लावूनी
मान राखते ती पणतीचा
औक्षण करते ती भावाला
भावाची वर्षभर मिळेल छाया
पाठीराखा भाऊ जवळचा
वेड्या बहिणीची वेडी ही माया
ऋणानुबंध जन्मोजन्मीचे
जसे द्रोपदी आणि कृष्णाचे
प्रार्थना करी उदंड आयुष्याची
भाऊ बहिणीचे नाते अतूट प्रेमाचे
दोघांच्या नात्यात स्नेहविश्वास
मनी प्रेम वसे प्रत्येक क्षण
करीतो भाऊ सदा रक्षण
नाते जपणारा दिवाळी सण
भाऊबीज नाते जिव्हाळ्याचे
आत्मिक समाधानाच्या नात्याचे
पित्यासम असे तिच्यावर छाया
रक्षण करी क्षणोक्षणी बहिणीचे
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=======
0
6
5
6
0
4



