Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

रानफूल

सुचिता नाईक देगलूर, नांदेड

0 4 8 2 9 7

रानफूल

कडे कपारी डोंगर दरी
उंच पर्वत तर हिरवळ मैदानी
इकडे तिकडे चोहीकडे
रानफूल मी दिसे सगळीकडे…

इवल्याश्या या हरीत तृणावर
इवले इवले माझे रुप गोजिरे
चटकदार रंगाचे देखणं सौंदर्य
मोहवून टाकते हास्य लाजिरे…

ऊन वारा असो की पाऊस
मजला ना तमा कशाची
हसत डोलत बसतो मी
नसे भय रात्र प्रहर का दिवसाची…

येता जाता पाहती मजला
आकर्षित करतो सर्वांच्या नजरा
न लाडावित न गोंजारीत कुणी
न माळती कुणी माझा गजरा…

एकटेच जरी असलो तरी मी
धर्म तर माझे फुलण्याचेच
क्षणभंगुर जरी जिवन माझे
कौशल्य माझ्यात आनंदाने जगण्याचे…

सुचिता नाईक
देगलूर, नांदेड
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे