वचनपूर्तीचा रंगतदार सोहळा
जि.प.प्रा.शा.रत्नापूर
परभणी: काल 12 मार्च रोजी रत्नापूर जिल्हा परिषद शाळेत रंगला वचनपूर्तीचा आनंदमय सोहळा.
4 मार्च रोजी संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात 22 गाण्याचे सादरीकरण.
शाळेतील शिक्षक संग्राम कुमठेकर सरांनी 22 गाण्यातील 22 उत्कृष्ट कलाकारांना 2200 रुपयाचे बक्षीस देण्याचे दिले होते वचन.
दि. 12 मार्च रोजी कुमठेकर सरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 3000 रुपयांचे बक्षीस देऊन केली वचनपूर्ती.
22 गाण्याचे उत्कृष्ट परीक्षण केल्याबद्दल मोटे मॅडम व आवले मॅडम यांचा सत्कार.
वाढदिवसानिमित्त सहकारी भगिनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आणि सदस्यांनी केले सरांचे औक्षण.
मु.अ.अशोक भाऊ सरवदे सरांनी शाळेतर्फे केक व स्नेहभेट, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
वचनपूर्ती सोहळ्यापूर्वी खेळीमेळीच्या वातावरणात SMC बैठक संपन्न.
100 % विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त कुमठेकर सरांनी दिली स्नेहभेट.
शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात वाढदिवस साजरा करून स्नेहभेट दिली.



