नेपाळमधील महाप्रलय
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, जि.नागपूर

नेपाळमधील महाप्रलय
आपण मागील भागात काही नेपाळमधील भावुक क्षण बघितलेत. पाण्याच्या धारदार प्रवाहामुळे अक्षरशः खरडून निघालेली जमीन, चिखलामध्ये रूतलेले अगणित श्वास, अन् त्याच्या मदतीसाठी जगभरातून पुढे आलेले मदतीचे हात नेपाळमध्ये पाहयला मिळत होते. नेपाळमधील भीषण महापुरात शेकडो जणांचा मृत्यू झाल्यानंतर बेपता नागरीकांच्या शोधासाठी कुटुंबीयाची धावपळ सुरू आहे. संपर्क तुटलेल्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी कुटुंबातील लोक रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या जखमी आणि मृतांची माहिती तपासत आहेत.
1) नेपाळमध्ये अडकलेले नागपूरचे पर्यटक सुखरूप:
नेपाळमध्ये जलप्रलयात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे नागपुरातून गेलेले अनेक पर्यटक अडकून पडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नानंतर काठमांडूहून मुख्यमंत्र्याच्या फोननंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी या पर्यटकाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. काठमांडूहून जनकपूरपर्यंत जाण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर चार मिनी बसची व्यवस्था केली. या बसमधून सर्व 106 पर्यटक भारत नेपाळ सीमेजवळून तेथील बिहारमधील दानापूरपर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली. दानापुरहून पुढे रेल्वेने नागपूरला परतण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानलेत.
2) भोलेनाथानी मृत्यूच्या दाढेतून वाचवले:
छत्रपती संभाजीनगर येथील मैत्रीणीचा गुप्र पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी 15 ऑगस्टला निघण्याच्या अवघ्या 12 दिवस आधी अचानक निरोप आला. परमिट मिळाले नाही, तुमची यात्रा रद्द झाली. मात्र नेपाळला रद्द झालेल्या ट्रिपने त्यांना नवे आयुष्यच दिल्यांची भावना कविता घोडले यांनी मांडल्यांत त्या म्हणाल्यांत, “नियोजनानुसार 15 ऑगस्टला प्रवास सुरू करून, ज्या दिवशी नेपाळमधील त्या विशिष्ट ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार होता.अगदी त्याच ठिकाणी महापूर आला. जेव्हा परमिट रद्द झाले, तेव्हा वाटले बाबानी आपल्याला बोलवले नाही. पण आज समजले त्यांना आमचे रक्षण करावयाचे होते.
3) प्रकल्पाच्या बोगद्याने अनेकांचे प्राण वाचविले:
तिबेट सीमेजवळ हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर आलेल्या महापुरात चिखल पाण्याचा लोंढा वरून जात असताना नेपाळमधील अप्पर त्रिशुली जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याने अनेकांचे प्राण वाचविले आहेत. या बोगद्यात गेलेल्या कामगारापैकी 350 जणांची सुटका करण्यात आली, असून त्यात 65 भारतीयांचा समावेश आहे. मात्र बोगद्यात अडकलेल्यांना अथक परिश्रमानंतर काढण्यात आले.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, जि.नागपूर
=======



