Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 1 6 5 2

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : रंग लावू चला📘*
*🔸मंगळवार : ०३ / मार्च /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*रंग लावू चला*

सण आला होळीचा
आनंद आणि हर्षाचा
रंग लावू चला मित्रानो
एकमेकांना रंग लावू चला

नैसर्गिक रंगाची मित्रा
करूया आज उधळण
नभाच्या आकाशी रंगात
चिंब भिजवूया तनमन

गुलाबा कडून घेवू थोडा
प्रेमाचा लाल रंग
प्रेम, आपुलकी नात्याचा
जपूया अतूट बंध

हिरवी स्वप्न बाळगू उराशी
रंगू हिरवाईच्या रंगात
नवं चैतन्याचा रंग हिरवा
आज उधळूया उत्साहात

धुळवण करूया साजरी
पळसफुला संग केशरी
निसर्गिक रंगाची आज
मारूया पिचकारी

एक रंग लावू चला मित्रानो
शांती करुणा आणि मैत्रीचा
रंग पांढरा उधळून मनसोक्त
जगाला संदेश देवूया शांतीचा.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

रंग लावू चला
आज होळीला
रंग लालीलाल
जाऊ लावायला ॥१॥

रंग हळदीचा
आणि सूर्य फुलाचा
पिवळा धम्मक
मोहक गुलालाचा ॥२॥

आकाशी निळा
आणि जांभळा
काळ्या फळ्याचा
फासू काळा ॥३॥

रंग भडक तांबडा
हिरवा हिरवागार
म्हणे अरे पकडा
गणूला,करू गार ॥४॥

घेतला शेंदरी
लावला भाळी
घेऊन केशरी
मळवट भरला कपाळी ॥५॥

रंगांची जत्रा
भारीच खत्रा
आला शामू भित्रा
म्हणे धाव मित्रा ॥६॥

चला रे चला
रंग लावू चला
विचारू नका
आता कुणाला ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

चला चला सारे
रंग आपण खेळूया
एकमेकांवर खूप
रंग फुगे फेकूया…१

आज आहे धुळवड
रंग लावू चला
नवीन वर्षातला
सण होळी आला…२

निळा लाल पिवळा
रंग नभात दिसती
धर्तीवर चुहुकडे
इंद्रधनू भासती…३

चल गण्या लवकर
चौकात सारे जमुया
एकमेकांवर आज
पिचकारी मारुया…४

आली रंगपंचमी
खेळ रंग पाण्याचा
मनमुराद हर्ष लुटू
सण आज होळीचा…५

धुलीवंदनाचा क्षण
आहे खूप वेगळा
रंग चला खेळूया
निळा काळा पिवळा…६

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*रंग लावू चला*

सण होळीचा आला हर्षून
रंग लावू चला एक मेका
सप्त रंगाची करू उधळण
प्रेमा संगे घेऊ ठेका

रंग खेळू प्रेम भावे
निसर्गासी जोडू नाते
जीवनात भरेल रंग अपुल्या
आनंदाचे गीत गाते

रंगात भिजुनी होऊ चिंब
लावू रंग होऊ दंग
द्वेष,मत्सर देऊ जाळून
प्रेम ह्रदयी फुलऊ संग

लाल रंग लावू गाली
गुलालाची असे भरारी
निळा रंग आकाशाचा
सप्त रंगानी खेळू होळी

भेदभाव विसरून जाऊ
मैत्रीचे नाते फुलवू
उत्सव प्रीय होऊ आपण
रंगातून हास्य खुलवू

*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*झिंगाबाई टाकळी नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

झाली साजरी होळी
धुलीवंदन खेळू चला
करू रंगाची उधळण
एकमेंका रंग लावू चला

सुट्टी आहे शाळेला
मनसोक्त हुंदडू चला
निसर्गातील फुलांचे
नाना रंग वेचू या चला

पळस फुलला रानात
त्याचे फुले तोडू चला
केसरी रंग छानपैकी
अंगावर शिंपडूया चला

नाना रंग लाविले तरी
काळा नि पांढरा नाते
आम्हा विद्यार्थ्यांचे ते
तर मनोरथ पूर्ण करते

हिरवा पांढरा बोर्डावर
दिसे उठून लाल निळा
बदलवून टाकी तोच
आमचीही जीवनकळा

ठरवले आहे आम्ही
रंग येती जाती जीवनी
काळानुरूप बदलले
त्यातून घेऊ कलाटणी

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

चला सर्वजण जमूया
होळी सण साजरा करूया

लाकूड , गोवऱ्या आणूया
होळी साऱ्यांनी उभारूया

होलिका दहन करूया
वाईट वृत्तीला जाळूया

एकदिलाने सारे खेळूया
रंग लावू चला रंगात रंगूया

विविध रंग मिसळूया
सप्तरंगात या न्हाऊया

पाण्याचा वापर टाळूया
सुका रंग एकमेकांना लावूया

मतभेद सर्वांनी विसरूया
एकोप्याने आपण राहूया

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

रंगात जावू रंगून
आज रंगपंचमीला
रंग लावू चला
जपू आपण मैत्रीला

वसंताला आला बहर
पळस फुलले रे आता
बनवू फुलांचा रंग
टिकून राहील ऐकता

एकमेकाला लावून रंग
दाखवू आपली आपुलकी
करून एकमेकाला मदत
जपू आपण माणुसकी

रंगून जाऊ रंगात
बुडून जावू भंगात
घेऊ आनंद होळीचा
आपल्या शाळेच्या सुट्टीचा

लाल गुलाबी हिरवा पिवळा
उधळण करू गुलालाची
स्नेहाने भेटू एकमेकाला
आठवण करू संस्कृतीची

वर्षातून येतो एकदाच
हा होळीचा सण
आता रंग लावू चला
भरून येईल आनंदाने मन

*केवलचंद शहारे*
*,सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

मिताली,शुभांगी,मिनू चला ग
रंगपंचमी आज रंग लावू चला
हिरवा,लाल,पिवळा,गुलाबी
निळा विविध रंग उधळू चला

केसरी रंगाची पळस फुले घेऊ
भिजवून त्याचे रंग तयार करू
निसर्गातील फुलांच्या रंगाने
रंगून रंगपंचमी साजरी करू

रंग मैत्रीचा रंग जीवाभावाचा
रंग समतेचा रंग एकात्मतेचा
सण उत्सव संस्कृती जपू या
हा सण थोरामोठ्यांचा मौजेचा

पिचकारी मारता रंगली राधा
राजू, शरद,रिंकू भिजले रंगात
हर्ष जाहला बालगोपालांच्या मनी
किती जिव्हाळा होता रंगता मैत्रीत

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

नवरंगाची रंगपंचमी
रंग लावू चला
दोस्ती मस्ती करू धमाल
रंग उडवू चला .

लाल पिवळा निळा जांभळा
भरून घेऊ पिचकारी
भित्रा कोणी लपून बसला
काढा त्याला बाहेरी.

निळा कोल्हा लाल माकड
ओळखू येईना कोणी कोणा
दाविती वाकुल्या माकड चाळे
कुणी ना उरला रंगाविना.

इथे ना कोणी लहान मोठा
रंगपंचमीचा आनंद लुटा
विसरा मत्सर हेवा दावा
संस्कृतीचा अमोल ठेवा.

*सौ विमल धर्माधिकारी वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️
*रंग लावू चला*

रंग लावू चला
गुलाल उधळु चला
मजा करु हर्ष होई
टिळा लावू कपाळाला !!

रसायन रंगाने झाले
कुरूप विद्रुप गाल
साबणाने डाग निघेल का ?
डांबर वंगण फासलेल !!

लहान लहान मुले घेऊन
पिचकारीने पाणी उडवि
रंगोत्सवी सजला सोहळा
रंगपंचमीला अंग भिजवि !!

लाल लाल कुंकू
धुळवडीला फुकु
इवलेसे हात माखले
डोळ्यात धुळ नको फेकू !!

आजोबाला उत्साहाचा ताव
चिंकु आजीलाही रंगव
लडीवाळ नातु आला रंगवाला
पवन कडून होळीच्या शुभेच्छा !!

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟💥🫟♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे