0
4
8
2
9
4
दारूचा पहिला घोट
मित्रा, नको दारू पिऊस
जरा थोडा थांबशील,
आज तू तिचा घोट घेतोस,
उद्या ती तुझा घोट घेईल.
किती कुटुंबं उध्वस्त झाली
ठाऊक आहे का तुला?
दारूपायी संपत्ती गेली,
भिकही मिळेना कुणाला.
लागले भिकेला पिणारे,
विकणारे धनवान झाले,
पिणाऱ्यांचे कुटुंब पत्नी
मुलबाळ रस्त्यावर आले.
“बेवडा” म्हणती तुला
मान-सन्मान गमावला,
कुटुंबास त्रास देतोस,
शेजारीही त्रासले तुला?
कधी घेतलास पहिला
घोट, आठवतं का तुला?
दारू पिणं सोडशील का?
बघ, जमतंय का तुला?
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट, जि. वर्धा
=========
0
4
8
2
9
4



