Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

हिंदू देवता: शोध, चिंतन व स्वैर कल्पना विलास

डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, नागपूर

0 5 6 8 0 4

हिंदू देवता: शोध, चिंतन व स्वैर कल्पना विलास

माझ्या मते संपूर्ण तर्कशास्त्रावर, तात्विक व वैज्ञानिक संशोधनावर आणि कृतज्ञता तत्वावर आधारित देवांचे प्रकार कोणते व कशाशी संबंधित असावेत ते आपण मागील लेखात विदित केलेत. पुन्हा एकदा विवेचित करतो की हे व ह्यातील प्रत्येक प्रकार हा यासाठी देव मानला आहे, की त्या त्या प्रकारात ‘दिव्यत्व ‘ आढळते. ज्यात दिव्यत्व आढळले तो ‘ देव’ असे समजल्या गेले. देव म्हणजे ईश्वराचा अंश, पूर्ण ईश्वर नाही.

१. मानवी जगण्यास सहायक मानवी प्रवृत्ती (उदा. संशोधन, लिखाण, सामाजिक कार्य करण्याचा मनोभाव ):- कर्तव्य पार पाडण्याकरिता केली जाणारी प्रवृत्तीची कर्मे. [कृतज्ञता म्हणून त्यां कर्मात ईश्वरी अंश आहे हा विचार]
२. मानवी जगण्यास सहायक मानवी शरीरातील अंतस्थ क्रिया:- श्वसन, भूक (जठराग्नी ), निद्रा(देवी) , कामवासना (कामदेव) वगैरे [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार].
३. ज्यास आपल्या साह्याची आवश्यकता आहे, आणि ती आपण पूर्ण केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त करण्याची संधी जो देतो त्यात:- उदाहरणार्थ – बालक , याचक, अथिती .[ कृतज्ञता म्हणून ईश्वरी अंश आहे हा विचार]
४. उपसर्ग (त्रास ) न देणारे श्रेष्ठ गुण :- सत्य, अहिंसा, बल, प्रामाणिकपणा , वचनबद्धता, दातृत्व [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
५. समाजाला सन्मार्ग दर्शविणारे गुणवान महात्मे :- (अवतारी पुरुष) –श्रीराम, श्रीकृष्ण, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , भगवान बुद्ध , येशुख्रिस्त ,मु .पैगंबर [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
६. जीवन सुसह्य करणारे:- देश, भूमाता (शेती), आरोग्य , वैद्य (डॉक्टर),औषध [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
७. सदभावना:- प्रेम ,आदर ,हौतात्म्य [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
८. आनंददायी:- संगीत, कलागुण [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
९. सप्त चिरंजीव – सप्त प्रवृत्ती- या कालातीत आहेत:- {अश्वत्थामा = क्रूरता वृत्ती , बळीराजा = कृषिविद्या वृत्ती, व्यास= साहित्य-कथा /काव्य निर्मिती करण्याची वृत्ती , हनुमान = सेवक वृत्ती +निष्ठा, बिभीषण = स्वार्थासाठी गद्दारी /विश्वासघात करण्याची वृत्ती(घरका भेदी लंका ढाये), कृपाचार्य= ज्ञानदान / शिक्षण देण्याची( शिक्षकी ) वृत्ती, परशुराम = संशोधन करण्याची (संशोधक) वृत्ती – यांनी धनुर्विद्या / धनुष्य बाणाचा शोध लावला } [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१०. तत्कालीन अनाकलनीय:- सूर्य ,चंद्र , तारे, वीज , पृथ्वी , आकाश, निसर्ग, ग्रह तारे , पंचमहाभूते .
[कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
११. उपरिनिर्दिष्ट दैवतांची प्रतिमा:- मूर्ती, चित्र [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१२. उपरिनिर्दिष्ट दैवतांची प्रतिके:- वरील सर्वांची परिचय चिन्हे .उदाहरणार्थ – ध्वज, मंदिराची पायरी, मंदिराचा कळस वगैरे . [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१३. उपरिनिर्दिष्ट दैवतांच्या लिखित “मनातील स्मृती /उपदेश ”:- श्रीमत् भग्वतगीता, श्रीगुरुग्रंथसाहेब,बायबल, कुराण वगैरे. [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१४. समस्त मान्य केलेल्या देवतांची लिपीबद्ध नावे:- (कोठल्याही भाषेतील लिपी) [ कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१५. प्रार्थना चिन्हे म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार :- .ॐ, श्री, Ɯ.
१६. पशुजन्य खाद्य पदार्थ, शरीर पोषक औषधी गुण आहेत :- दूध, तूप, मध [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१७. मानवास जगण्यास आवश्यक :- सर्व प्रकारचे अन्न पदार्थ [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१८. मानवास उपयुक्त वृक्ष:- वट वृक्ष , पिंपळ वृक्ष, औदुंबर वृक्ष.[ कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
१९. मानवास उपयुक्त झुडुपे स्वरूपी वनस्पती :- तुलसी , आघाडा, केना , दुर्वा [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]

या नंतरचे उर्वरित सहा प्रकार आपण पुढील लेखात बघूयात. परंतु एक विचार सदैव मनात प्रश्न उपस्थित करून देतो, की ह्यांना ईश्वरी अंश म्हणून का बारे पुढे आणल्या गेले? त्याचे उत्तर एकच असू शकते. ते म्हणजे ह्याच बाबी एकमेकांच्या श्रद्धा स्थानांची जाणीव पूर्वक जोपासना करून सामाजिक अखंडत्व, एकता, बंधुभाव यांची दृढ सांगड घालू शकतात. त्यामुळेच ह्यांचात ईश्वरी अंश असला पाहिजे. जेणेकरून कोणी ह्या समस्त गोष्टींची चेष्टा करू नये, टर उडवू नये. आणि मानवी स्वभावानुसार ज्या गोष्टींची मनात भीती असते, त्याची कधी कुणीही थट्टा मस्करी करीत नाही. केवळ याच उद्देशाने. हे सगळे आपल्या मनुष्य प्राण्यांना एकत्र ठेऊ शकतात. कारण समस्त ज्ञात ब्रहांडात फक्त पृथ्वीवरच जीवन आहे. या पृथ्वीवासी सजीवांपैकी केवळ मानवासच नैसर्गिक म्हणा किंवा ईश्वराने स्वसंरक्षणास एकही शारीरिक अवयव, शस्त्र म्हणून दिलेला नाही. मानवाची एकजूटच सर्वात मोठे शस्त्र आहे.

(उर्वरित क्रमश: पुढील अंकात)

डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, नागपूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे