
0
5
6
8
0
0
मुखवटा
मुखवट्यावर मुखवटे
किती चढवशील गड्या ?
सोंग करू नकोस खोटी
जिंदगी आहे रे ही छोटी
खरं रूप जेव्हा पडेल
जगासमोर या रे उघडं
खेटरांनी करतील पुजा
पळशील कुठं रे नागडं ?
मुखवटा तुझा नाटकी
वागू नकोस आत्मघातकी
अश्रूंचीही कळते भाषा
जागवू नकोस खोटी आशा
मुखवटा बदलणा-यांनो
जीवनाचे रे जाणा सत्य
जन्मदात्यांचे जाणा ऋण
अंगी बाणवा त्यांचे सदगुण
सरड्यावाणी बदलून रंग
क्षणोक्षणी रे बदलता ढंग
करू नका कुणाचे स्वप्नभंग
माणुसकीचे रे असू द्या अंग
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
5
6
8
0
0



