Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

तुणंतुणं

तुणंतुणं

0 4 8 2 9 0

तुणंतुणं

सखे तुझं गं तुणंतुणं
करशील का जरा बंद ?
आषाढघन गं बरसती
घेऊ प्रेमांगणी प्रेमानंद

सखे तुझ्या गं मनाची
तगमग मला कळाली
तुझ्या गं सुखासाठी
पावलं शेतात वळाली

सखे किंमती स्वर्णहार
नाही घेऊ मी शकणार
तुला सुख देण्यासाठी
नाही कधी मी थकणार

रूप तुझं गं आरसपाणी
पोशिंद्याची गं तू महाराणी
घाम गाळून गं पिकवितो
धान्यरूपी गं माणिकमोती

सुखाचा गं भरविन घास
हिरव्या रानी मोकळा श्वास
अतूट नातं सखे अनमोल
तुझ्यापुढं गं रत्न कवडीमोल

संग्राम कुमठेकर लातूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे