
0
4
0
8
9
0
मायलेकी
दुष्काळाचे साहून चटके
पायी अनवाणी फिरत राहे
खळगी पोटाची भरण्यासाठी
झुंजली ती माझी माय आहे
हात नेहमीच राकट खडबडीत
ममतेचा झरा नित्य वाहे हृदयात
तोंडाचा पट्टा बेताल वाटे जरी
जबाबदारीचा डोंगर वसे डोक्यात
संसाराचे ओझे हसत पेलतांना
नेहमीच पाहीले दुःख गिळतांना
गरीबीला हसत दाविल्या वाकुल्या
रापलेले हात कपोली फिरतांना
चालवला तिचाच वारसा नेमाने
संसार सुखी केला मोजला ना मापाने
नव्हते माहीत आम्ही मायलेकी
पिडलेल्या सदा स्त्रीत्वाच्या शापाने
सविता धमगाये, नागपूर
==========
0
4
0
8
9
0





