Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

अकल्पित

दत्ता काजळे 'ज्ञानाग्रज'

0 4 8 2 9 0

अकल्पित

वाचनाचा छंद जपताना
जपताना लेखणी भाळली
चारोळीच्या निर्मितीने मज
मज काव्यरचना कळली //

सात वर्षांपूर्वी अकल्पित
अकल्पित ही वाट घावली
जणू वाटते आज मजला
मजला प्राप्त गुरुमाऊली //

मराठी भाषा सक्षमतेचा
सक्षमतेचा ध्यास कल्पिला
मराठीचे शिलेदार द्वारी
द्वारी काव्यरथ दौडविला //

सन्मानपत्र गौरव नित्य
नित्य लाभता हर्ष जाहला
उत्तरोत्तर काव्य लेखन
लेखन उत्साह दुणावला //

प्रारंभी नियमभंग होता
होता दादांचा राग झेलला
हळव्या मनाचा ज्ञानाग्रज’
ज्ञानाग्रज’ दादांना भावला //

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे