
0
3
5
3
1
5
आयुष्य एक पुस्तक
आयुष्य एक पुस्तक
सुखदुःखाची अनेक पाने
ओठी असावे आपल्या
मंगलमय सुरेल जीवनगाणे
पाने पलटत राहतील
इथे प्रत्येक वळणावर
उपभोग घ्यावा आनंदे
संयम ठेवून मनावर
पुस्तकरूपी हे आयुष्य
धडे बरे वाईट अनेक
सारांश नेमका शोधावा
प्रश्नांना उत्तरे हवी नेक
आयुष्याच्या या पुस्तकाचे
लेखक आपणच असतो
लेखणी चालवावी नेटकी
कर्माचा लेखाजोखा ठरतो
शेवटचे पान या पुस्तकाचे
निष्कलंक असेच रहावे
वाचून संपले पुस्तक जरी
तरी किर्तीरूपे हे उरावे
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
==========
0
3
5
3
1
5