
0
5
9
0
3
4
अपेक्षा
मी सांगते तुला नेहमीच,
ऐक माझं जरा.
उगीच ओढाताण करून
अपेक्षांची वाहू नको धुरा.
उगीच कुणाची वाट पाहण्या,
नाही काहीच मजा.
आपण काळजीने थांबतो,
पण त्यांना वाटते बोजा.
काळे कुठ ढग आल्यास,
पाणी तर बरसणारच आहे.
स्वतःला कितीही आवरल,
मन तर तरसणारच आहे.
उगीच जिवाचा आकांत करू
स्वकीयांसाठी किती झुरणार
थांब थोडं श्वास घे
तू कोणालाच नाही पुरणार.
माझं माझं करून उगीच,
जीवाला आशा लावू नको.
निराशाच पदरी येते,
अपेक्षांचा ओझं वाहू नको.
आशा अपेक्षांसोबत मनाला,
जगण्याची ओढ असते.
पण त्या पूर्ण होतीलच,
याचं मात्र खरंच कोड असते.
बेबी/आनु बोईनवाड
जिल्हा नांदेड
0
5
9
0
3
4



