
0
5
9
0
3
4
मांडव
पांडुरंगाच्या हो दारी
मांडव सजलाय भारी
स्वागत करतात नारी
साजशृंगार करून भारी
अंगण रांगोळीने सजले
रिंगण वारक-यांनी धरले
पांडुरंगाच्या हो दारी
मांडव सजलाय भारी
आषाढी एकादशीची वारी
मांडवात जमल्या नर-नारी
विठ्ठलाचे पाहून स्वरूप
वारक-यांचा वाढे हुरूप
पांडुरंगाच्या हो दारी
मांडव सजलाय भारी
डोईवर घेऊनी कळस
डुलते हिरवीगार तुळस
मनोभावे पडतात पाया
भक्ताला पाव ना विठुराया
पांडुरंगाच्या हो दारी
मांडव सजवलाय भारी
साकडं घालतो विठुराया
काळ्या मातीची भिजव काया
काळ्या आईला घाल न्हाऊ
विठुरायाची गाणी मग गाऊ
पांडुरंगाच्या हो दारी
मांडव सजवलाय भारी
आषाढी एकादशीचा सोहळा
विठुदर्शनाविना लागेना डोळा
विठुमाऊलीचा होता पदस्पर्श
मनाला होईल खूपच हर्ष
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
5
9
0
3
4



