आगरी समाज संस्था अलिबागच्या “विवाहमिलन” कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
आगरी समाज संस्था अलिबागच्या “विवाहमिलन” कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय असलेल्या आगरी समाज संस्था अलिबाग यांच्या बहुपयोगी “विवाहमिलन वधू-वर परिचय केंद्र” या उपक्रमाच्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी मोरया कॉम्प्युटर्स, ब्राह्मण आळी, महावीर चौकजवळ, अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी आधार मिळणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाधारित विवाह परिचय केंद्र सुरू करून संस्थेने आत्तापर्यंत www.vivahamilan.com या संकेतस्थळाद्वारे सर्वजातीय युवक-युवतींसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेक पालकांना ऑनलाइन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, संस्थेचे सभासद आणि मोरया कॉम्प्युटर्सचे मालक श्री. मिलिंद पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात ‘नोंदणी मदत केंद्र’ सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानासाठी संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विवाहमिलन केंद्राचे व्यवस्थापन व जबाबदारी श्री. मनोहर पाटील यांनी स्वीकारली असून, दिवाळीनंतर नियमित वेळापत्रक सकाळी ११ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ६ असेल. संपर्क: श्री. मनोहर पाटील — ९४२२५९४५७१ / ८१७७८३५११८ (विवाहमिलन हेल्प लाईन)
शुभारंभ सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनील तांबडकर, सेक्रेटरी श्री. प्रभाकर ठाकूर, सहखजिनदार श्री. राजेंद्र पाटील, मुख्य सल्लागार श्री. अनंत म्हात्रे, श्री. प्रसाद पाटील तसेच अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. तुषार थळे, श्री. श्रेयस ठाकूर, श्री. सार्थक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय प्रमुख केंद्र ठरेल, तसेच “भव्य आगरी समाज भवन” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. संस्थेच्या या उपक्रमात सर्व सभासद, समाजबांधव यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.





