आदर्श शेतकरी ‘तुषार बेहरे’ (रावसाहेब) यांचे अपघाती निधन
जिल्हा प्रतिनिधी धुळे

आदर्श शेतकरी ‘तुषार बेहरे’ (रावसाहेब) यांचे अपघाती निधन
जिल्हा प्रतिनिधी धुळे
धुळे/शिंदखेडा (दि २२): सिलवासा स्थित मराठीचे शिलेदार समूहाचे हितचिंतक शिक्षक प्रशांत ठाकरे सर आणि मराठीचे शिलेदार समूहाच्या कार्यकारी संपादिका सविता पाटील ठाकरे यांचे मेहुणे आदरणीय (रावसाहेब) तुषार शामराव बेहेरे यांचे (दि २१) मोटारसायकलला भरधाव वेगाने जाणा-या चार चाकी (कार ) वाहनाने धडक दिल्याने अपघाती निधन झाले. ते वय (६१) वर्षाचे होते.
जखाणे, तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले तुषार बेहेरे (रावसाहेब) हे एक आदर्श शेतकरी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण बेहेरे आणि ठाकरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते श्री अनुराग बेहेरे आणि कुमारी अपूर्वा बेहेरे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तुषार बेहरे यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झालेला आहे. ते अत्यंत मृदुभाषी व समाजप्रिय आणि सोज्वळ व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या पंचक्रिया विधीचा कार्यक्रम शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी धुळे येथे संत गाडगेबाबा कॉलनी या ठिकाणी करण्यात येणार आहे.





