आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध
श्वासाची किंमत
0
4
8
2
9
7
श्वासाची किंमत
कुणी जगतो मरतांना
कुणी मरतो जगतांना
श्वासाची किंमत कळते तेव्हा
जगावेसे वाटते जीव जातांना ॥
आत्महत्या करणारांनो
जीव एवढा स्वस्त नाही
नैराश्य आले जरी कितीही
जीव देणे रास्त नाही ॥
प्रसववेदना आठवून बघ
जन्म तुला देतांना
श्वासाची किंमत विचार तिला
श्वासात श्वास भरतांना ॥
जगण्यासाठी धडपडतो
मृत्यूशय्येवर असतांना
श्वासाची किंमत कळते तेव्हा
सर्वच सोडून जातांना ॥
बघावे एकदा विचार करून
जिवावर कुणाच्या उठतांना
अनुभवावे समाधान थोडे
श्वासाची किंमत जाणतांना ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
========
0
4
8
2
9
7



