Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

आपल्या हृदयातच ईश्वराचा वास असतो

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 4 8 2 8 6

आपल्या हृदयातच ईश्वराचा वास असतो

देह देवाचे मंदिर
आत आत्मा परमेश्वर l
जशी उसात हो साखर
तसा देहात हो ईश्वर l
जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणी l
देव देहात देहात
का जातो देवळात l
तुका म्हणे मूडजना
देही आत्मा का पहा ना

‘आपल्या देहाच्या मंदिरात हृदयातच ईश्वराचा वास आहे’. आपला आत्मा हाच परमेश्वर आहे. उसामध्ये साखर जशी दिसत नाही तिची गोडी चाखूनच अनुभवावी लागते तद्वतच आपल्या देहातील परमेश्वर पण ध्यान करूनच अनुभवावा लागतो. दुधामध्ये जसे लोणी लपलेले असते ते काढण्यासाठी आपल्याला दूध तापवावे लागते नंतर दही लावावे लागते व त्याचे मंथन केल्यावर लोणी ताकावर तरंगायला लागते. तसेच हा आपला देह जर ध्यान अग्नीने आपण तापवला तर आपल्याला हृदयस्थ चक्रपाणिचे दर्शन होईल . “जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत”तुमच्यात आणि माझ्यात प्रत्येकातच त्या भगवंताचा वास आहे, प्रत्येक देहात देव आहे त्याला ओळखा देवळात जायची गरजच काय?

तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की अरे मुढांनो तुम्ही स्वतःत डोकवा, या देहातील आत्मतत्त्वाचे दर्शन घ्या. आपणही रोज सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या हृदयस्थ परमेश्वराला माझ्यातील हृदयस्थ परमेश्वराचा नमस्कार हे वाक्य रोज ऐकतोच. त्या आत्म तत्त्वाचे दर्शन व्हावे साक्षात्कार व्हावा म्हणून त्या ओढीने सद्गुरू उज्वलानंद महाराज पहाटे तीन वाजता नित्य ध्यानाला बसत होते . आपल्याला तो साक्षात्कार लवकर होवो हीच त्या हृदयस्थ सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या चरणी विनंती .

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे