Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

उज्ज्वल साकार, वेलनेस सेंटर आणि वृद्धाश्रमास कौटुंबिक भेट

वसुधा वैभव नाईक, धनकवडी, जिल्हा पुणे

0 4 8 2 9 0

उज्ज्वल साकार, वेलनेस सेंटर आणि वृद्धाश्रमास कौटुंबिक भेट

वसुधा वैभव नाईक, धनकवडी, जिल्हा पुणे

पुणे : (जि प्र) आज दिनांक 3/05/2025 आज मुलगी, नातवंडे घेऊन ‘ ‘उज्ज्वल साकार, वेलनेस सेंटर आणि वृद्धाश्रम ‘ इथे भेट दिली. त्यांच्या भेटीला जाताना खाऊ घेऊन गेले होते. वृद्धाश्रमाला बरेच दिवस भेट दिली नाही यामुळे मी अस्वस्थ होते.

आज रोजी माझी इच्छा पूर्ण झाली. त्यातील एक जोडपे निगडीचे राहणारे होते. निगडी म्हणल्यानंतर मी अगदी लगेच विचारलं कुठे राहत होतात. कारण निगडीला मी दहा वर्ष राहत होते. कीर्ती विद्यालयामध्ये आठ वर्षे काम केले. त्यांनी जो पत्ता मला सांगितला तो कीर्ती विद्यालय जवळचा होता. आणि माझ्याबरोबरच्या मैत्रिणींना ते ओळखत होते. त्यामुळे ते मला दोघेही परके वाटले नाही. त्यांनाही खूप आनंद झाला एक निगडीची व्यक्ती त्यांना भेटायला आली होती.आम्ही नातवंडांच्या हातून खाऊ दिला. त्यांनी भरभरून आशिष दिले.

दुसरे गृहस्थ होते पुण्यातीलच मंगळवार पेठेतील. ते स्वतः इरिगेशन खात्यामध्ये काम करत होते. त्यांना भरपूर पेन्शन सुद्धा आहे. त्यांची मुलगी खूप श्रीमंत आहे. पण मुलीकडे राहणे त्यांना पसंत नाही. बायकोला देवाज्ञा झाली आहे. त्यामुळे ते इथे वृद्धाश्रमात आसरा शोधायला आले. आणि इथेच स्थायिक झाले.

बाकीचे दोघजण होते ते साताराचे होते. त्यांच्याशी जास्त चर्चा होऊ शकली नाही. कारण माझी एक मुलगी ऍडमिट आहे. गेले तीन दिवस ती ऍडमिट आहे. त्यामुळे मी तिथून निघाले. इथे सर्वांची व्यवस्था छान आहे. खोल्या स्वच्छ होत्या. प्रत्येक खोलीत ओव्हन होता फ्रिज होता. त्यांचे जेवण उत्तम असते असे मला त्या लोकांनी सांगितले.

माझी त्यांनी ओळख करून घेतली. मी लेखिका, कवयित्री, समाजसेविका, शिक्षिका असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला. गुगलवर सुद्धा मी आहे म्हटल्यानंतर त्यातील एकाने लगेच गुगल सर्च केले व माझे नाव शोधले. आपल्याला भेटायला आज कोणीतरी मोठी व्यक्ती आली असे त्यांना वाटले.त्यांनी मनोमन धन्यवाद दिले. मी पुन्हा मोठी काहीतरी आपले सेवा करीन नक्कीच हे आश्वासन देऊन मी माझ्या नातवांसहित बाहेर पडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे