ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे गावच्या सरपंचाला राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार
तुषार थळे

ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे गावच्या सरपंचाला राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार
डॉ. रजिनदारसिंह वालिया यांच्या हस्ते नासिकेत कावजी यांचा सन्मान
तुषार थळे
बिनधास्त न्यूज प्रतिनिधी
अलिबाग, जि. रायगड
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खंडाळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रुप ग्रामपंचायत खंडाळा गावचे आदर्श सरपंच मा. श्री. नासिकेत मधुकर कावजी यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र ग्राम विकास परिषद व महाराष्ट्र राज्य आयोजित नक्षत्र आयकॉन अवॉर्ड्स २०२६ या भव्य सोहळ्यात प्रमुख अतिथी डॉ. रजिंदरसिंह वालिया यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शाल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
खंडाळे गावात रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य तसेच शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध विकासकामांमुळे कावजी यांनी खंडाळे गावाला आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेल्याने खंडाळे गावासह संपूर्ण अलिबाग तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खंडाळे गावकऱ्यांनी तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



