
*
संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
*मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*
*मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
*सर्वोत्कृष्ट सहा
*
*विषय : संवादशून्य*
*बुधवार : ११ / जून /२०२५*
*संवादशून्य*
*संवादशून्य झाली नातीगोती*
*नाही देणेघेणे कुणाचे कुणाला*
*का आटलीय विहीर ममतेची*
*अर्थ न उरला का भावनेला*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*संवादशून्य*
मनाविरुद्ध काल घडलेलं
क्षणात विसरून जायचं
पुनरावृत्ती करुच नये
स्वआनंदा संवादशून्य रहायचं
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*संवादशून्य*
*कुणाचा कुणाशी संवाद नाही*
*सारेच संवादशून्य*॥
*आपल्याच कोषात गुरफटलेले*
*स्वतःलाच मानतात धन्य*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
*संवादशून्य*
हरवले तुझे प्रेम आज
जरी संवाद शून्य भावना
चाहूल लागते मनाला तुझी
प्रत्यक्ष समोर दिसतेस ना
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*संवादशून्य*
संवादशून्य परिस्थिती येता
आई मनमोकळे बोलायची,
एकमेकांशी संवाद करवून
मनीच्या भावना खोलायची.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
*संवादशून्य*
मोबाईलच्या जगतात
माणूस झाला संवादशून्य
थांग नाही मनाचा लागत
खाली उरते फक्त शून्य ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
*संकलन / समूह प्रशासक
*
*श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
*मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*