
0
3
5
6
2
9
अधोगती
कधी दुसऱ्यावर
अवलंबून राहू नये,
निर्णय घेतांना कधी
अविचाराने वागू नये.
दूरदृष्टीनें वागावे तुम्ही
नसता होईल,ज्ञानात क्षती,
उथळ वागण्याने होईल
आयुष्याची अधोगती.
सत्य आणि असत्याचा
विचारावर नको होकार,
स्वयं अवलोकनाणे
द्यावा, कधी कधी रुकार.
कोणतेही कार्य करताना
ज्ञानावर असावा विश्वास,
चुकूनही होऊ नये चूक
या साठी असावा सदैव ध्यास.
पुढे पुढेचालत रहावे
मागे कधी पाहू नये,
आपले कर्म स्वतः घडवावे
निराश कधी होऊ नये.
मायादेवी गायकवाड ठोकळ
ता.मानवत जि.परभणी
0
3
5
6
2
9