
0
3
4
5
6
1
विचार करू या
काही प्रश्नांची उत्तर शोधू या..
थोडा विचार करू या..?
गौतमाने जर सोडला नसता राजपाठ
तर, जगाला मिळाला असता का शांतीपाठ.. ?
जिजाऊने घडविला नसता शिवबा
महाराष्ट्रात आज कुणाचा असता घरोबा?
ज्योतीबाने स्त्री शिक्षणाचा उचलला नसता वीडा
संपली असती का स्त्री जन्माची पीडा..?
सावित्रीने टेकले असते मनुवादी पुढे घुटने
मिळाले असते का नारीला शिक्षणगंध उटणे?
गोऱ्यांपुढे पूर्वजांनी फैलवली असती भिकझोळी
चाखली असती का आज आपण स्वातंत्र्याची पोळी ?
भिमरायांनी दिला नसता जर परिवर्तनाचा लढा
आज कुठे असता बरे दलितांचा गाडा?
बापूंनी नसता धरला जर मार्ग शांतीचा
भारताचाही ईतिहास असता का रक्तरंजित क्रांतीचा?
थोरपुरुष हे देशाचे, आदर असावा मनामनात
पण, एकाचा आदर, दुज्याचा द्वेष, असे का व्हावे जनात ?
थोडा विचार करू या?
वनिता गभणे
आसगाव जि.भंडारा
==========
0
3
4
5
6
1