0
4
8
2
9
7
चोरीचा मोह
असा कुणी हाय का
ज्यानं केली नाही चोरी
देवही नाही सुटला ही
तर मानव जात सारी
मजा जी चोरीत आहे
नसे इमानदारीत जरी
घरच्या पक्वांन्नापेक्षा
आवडते बाहेरील भारी
असू द्या बायको सुंदर
आवडते मात्र सुंदरी
सुंदरीनाही वाटते मानस
मरावी त्यांच्यावरी
बालपणी करायचो
खाण्यापिण्याची चोरी
आनंद होता त्यात तसा
मित्रमंडळ होत भारी
प्रत्येक चोरी चांगली
असतेच अस नका धरी
खावी लागेल जेलची
हवा तेव्हा पडेल भारी
डॉ. बालाजी राजुरकर
हिंगणघाट जि. वर्धा
========
0
4
8
2
9
7



