Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

ऋतू हिरवा

पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर, जि.पुणे

0 4 0 8 9 0

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा आज बहरला
थंडगार वारा झणी शहारला
झुलतो मनाचा मोहक झुला
दरवळ धुंद मोगऱ्याच्या फुला ||१||

या हिरवाईने दिले आंदण
सुख आणि समृद्धीचे गोंदण
पुलकित आज नभी चांदण
जलधारांचे अवचित शिंपण ||२||

झाला शृंगार तरूशिखरांचा
आला थवा अल्लड पाखरांचा
झाला मिलाप गाय वासरांचा
घुमतो नाद दरी डोंगरांचा ||३||

बहरला ऋतू हिरवा मखमली
आनंदला शेतकरी या बर्षाकाली
पिके सारी जोमात निघाली
जगाच्या पोटाची चिंता निमाली ||४||

दान थोर या हिरव्या ऋतुचे
सुख शांतीचे आणि समृद्धीचे
गीत झंकारले हळव्या सुरांचे
गुणगान कंठाशी परमेशाचे ||५||

हिरवे वरदान राहो अबाधित
असू द्यावे ईश्वरा हेच संचित
निनादू दे असेच जीवन संगीत
ऋतू हिरवा ठेव अखंडित ||६||

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे