0
4
8
2
9
0
कंदीलशून्य
तुझ्याविषयीच्या स्वप्नपूर्तीस
आनंदाने बाळा मी झिजले
काळजाचा तुकडा हरवला
मन आसवांनी चिंब भिजले…
वाटे घर सुने सुने तुजवीण
सणोत्सवातही नाही सजले
कंदीलशून्य मन झाले आता
वाटते श्वासाचे दीप विझले….
तुझ्या विरह वेदनेने काळीज
मन खोलवर करपून भाजले
प्रत्यक्षात दिसेनास रे बाळा
स्वप्नात हाकेचे आवाज गुंजले…
किती लपवू दुःख हास्यात
विरहवेदनेचे काहूर माजले
जात नाही त्सुनामी मनाची
भावनेपेक्षा कर्तव्यास पुजले…
कंदीलशून्य मन जेव्हा मूकबधीर
कळत नाही कुठे नि काय वाजते
आनंद जीवनात मृगजळासारखा
कितीदा नव्याने जीवनाशी झुंजते…
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
0
4
8
2
9
0



